अमरावती - युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि अमरावती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या फोटोंवर चपला मारून त्यांचा निषेध नोंदवला. दिनेश सूर्यवंशी यांनी कारण नसताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भींतीवर असलेले सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आमदार वीरेंद्र जगताप यांचे फोटो काढले होते. या घटनेच्या निषेधार्थ युवक काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले.
अमरावतीत युवक काँग्रेस आक्रमक, जे. पी. नड्डांच्या फोटोला मारल्या चपला
युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी भाजपचे राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्ष जे.पी.नड्डा आणि अमरावती भाजपचे जिल्हाध्यक्ष दिनेश सूर्यवंशी यांच्या फोटोंवर चपला मारून त्यांचा निषेध नोंदवला. दिनेश सूर्यवंशी यांनी कारण नसताना जिल्हा परिषद अध्यक्षांच्या दालनात भींतीवर असलेले सोनिया गांधी, राहुल गांधी आणि आमदार वीरेंद्र जगताप यांचे फोटो काढले होते.
अमरावतीत युवक काँग्रेस आक्रमक
युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पंकज मोरे यांच्या नेतृत्वात कार्यकर्त्यांनी जे.पी. नड्डा आणि दिनेश सूर्यवंशी यांचे पोस्टर जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वाराला लटकवून त्यावर चपला मारल्या. तसेच त्यांचे पोस्टरही जाळले. यावेळी दिनेश सूर्यवंशी यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी समीर जवंजाळ, निलेश गुहे, सागर देशमुख आदींसह युवक काँग्रेसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.