अमरावती- जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसघांचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करून वाहनाची जाळपोळ करून गोळीबार केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गोळीबार झाला नसल्याचे म्हटले होते. मात्र, पोलीस अधिक्षक खोटे बोलत असल्याचा आरोप माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी केला आहे.
जिल्हा पोलीस अधीक्षक खोटे बोलतायेत; माजी मंत्री हर्षवर्धन देशमुखांचा आरोप - Devendra Bhuyar Attack Case News
जिल्ह्यातील मोर्शी वरुड मतदारसघांचे आघाडीचे उमेदवार देवेंद्र भुयार यांच्यावर हल्ला करून वाहनाची जाळपोळ करून गोळीबार केल्याची बातमी वाऱ्यासारखी पसरली होती. पण, जिल्हा पोलीस अधीक्षक यांनी गोळीबार झाला नसल्याचे म्हटले होते. मात्र, पोलीस अधिक्षक खोटे बोलत असल्याचे माजी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी आरोप केला आहे.
तर देवेंद्र भुयार यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार व कृषी मंत्री अनिल बोंडे यांनी देवेंद्र भुयार हे स्टंटबाजी करत असल्याचा आरोप केला होता. यावर माजी कृषी मंत्री हर्षवर्धन देशमुख यांनी पलटवार करत जिल्हा पोलीस अधीक्षक खोटे बोलत असल्याचे म्हटले आहे. अनिल बोंडे हे पालकमंत्री पदाचा वापर करून पोलिसांवरती दबाव आणत आहेत. शेंदुरजना घाट पोलिसांनी जाणीवपूर्वक तक्रार दाखल करून घेतली नाही, असा आरोप हर्षवर्धन देशमुख यांनी केला आहे.
हेही वाचा-लाखो गुरुदेव भक्तांनी साश्रुपूर्ण नयनांनी वाहिली राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना मौन श्रद्धांजली