महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Crime In Amravati : एमडी ड्रग्जची विक्री करणाऱ्याच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या; १ लाख ५२ हजारांचा मुद्देमाल जप्त - MD Drug

अमरावतीच्या इतवारा बाजारात पोलिसांनी मोठी करावाई केली. या कारवाईत २२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या घटनेत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे.

Crime In Amravati
डिलिव्हरी मॅन अटकेत

By

Published : Jan 21, 2023, 8:56 AM IST

अमरावती :इतवारा बाजारात ‘एमडी’ची विक्री करणाऱ्या डिलिव्हरी मॅनला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम मेफेड्रॉन ‘एमडी’ ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. शहर पोलिसांच्या गुन्हे शाखेने शुक्रवारी ही कारवाई केली. मोहम्मद वजीद वल्द अब्दूल नासीर कुरेशी ( वय ४०, रा. गवळीपुरा ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


1 लाख 52 हजाराचा माल जप्त : मोहम्मद वजीद हा शुक्रवारी इतवारा बाजार परिसरातील एका गुळ भंडारजवळ एमडी ड्रग्ज विक्री करीत असल्याची माहिती गस्तीवर असलेल्या गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली. त्या आधारावर पथकाने इतवारा बाजार गाठून मोहम्मद वजीदला अटक केली. त्याच्याकडून २२.५ ग्रॅम एमडी ड्रग्ज आणि इतर साहित्य असा एकूण १ लाख ५२ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी मोहम्मद वजीदविरुद्ध शहर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अर्जून ठोसरे यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक नरेशकुमार मुंढे, राजूआप्पा बाहेणकर, फिरोज खान, सतीष देशमुख, सुरज चव्हाण, निवृत्ती काकड, सुधीर गुडधे यांनी केली.


खरेदी करणारे कोण ते तपासणार : याप्रकरणी एमडी विक्री करणाऱ्यास गुन्हे शाखेने पकडले असले, तरी तो ती एमडी ड्रग्ज नेमका कुणाला विकणार होता, यापूर्वी त्याने तो ड्रग्ज कुणाला विकला. कुठून आणला, या दिशेने सखोल तपास केला जाणार आहे. त्यासाठी त्याच्या मोबाईलचा सीडीआर काढला जाणार आहे. त्यातून शहरात फोफावलेले एमडी नेमके येते कुठून, याचा उलगडा केला जाणार आहे.


अशी आहे एमडी ड्रग्ज : कॉलेजच्या मुला-मुलींमध्ये ‘म्यॅव म्यॅव’ आणि ‘एम-कॅट’ अशा सांकेतीक भाषेत ‘फेमस’ असललेल्या ‘एमडी ड्रग्ज’ या अमली ‘विशिष्ट डिलिव्हर्स’च्या माध्यमातून उपलब्ध करून दिला जात आहे. मेफ, बबल्स, ड्रोन, म्यॅव म्यॅव आणि एम-कॅट अशी त्याची वेगवेगळी टोपणनावे आहेत. युवा वर्गाला व्यसनाधीन करणारा हा पदार्थ शरीरासाठी घातक आहे. डिसेंबर २०२२ मध्ये देखील पोलीस आयुक्तांच्या विशेष पथक व नागपुरी गेट पोलिसांनी एमडी ड्रग्ज जप्त केले होते.

हेही वाचा :6 Naxalites Arrested सुकमा विजापूर जिल्ह्यात 6 नक्षलवाद्यांच्या सुरक्षा दलांनी आवळल्या मुसक्या, स्फोटक सामान जप्त

ABOUT THE AUTHOR

...view details