अमरावती -अमरनाथ यात्रेकरिता अमरावती शहरातून एकूण 30 जण गेले आहेत. अमरनाथ गुहा ( Amarnath Cave ) परिसरात आठ जुलै रोजी ढगफुटी ( Amarnath Cloudburst ) झाल्यामुळे अमरनाथ गुहा परिसरात हाहाकार उडाला असताना अमरावतीच्या खासदार नवनीत राणा ( MP Navneet Rana ) यांनी अमरावतीकर भविकांशी संवाद ( Amarnath Pilgrims ) साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत माहिती घेतली त्यांना यात्रेसाठी शुभेच्च दिल्या आहेत. अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर व्हिडिओ कॉल लावून आम्हालाही दर्शन घडवा असे, खासदार नवनीत राणा भाविकाला म्हणाल्या.
खासदार नवनीत राणा यांनी घेतली माहिती -अमरनाथ परिसरात ढगफुटी झाल्यामुळे एकूण 13 जणांचा मृत्यू झाला आहे अशा परिस्थितीत अमरनाथ यात्रेसाठी निघालेल्या अमरावतीकर भाविकांची चौकशी करून खासदार नवनीत राणा यांनी अमरनाथ ला निघालेल्या विक्रम नाथांनी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क साधला. यावेळी विक्रम नथानी यांनी आम्ही अनंतनाग येथे सुरक्षित असल्याचे खासदार नवनीत राणा यांना सांगितले. भारतीय सैन्याच्या वतीने अनंतनाग येथे एका कॅम्पमध्ये एकूण पाच ते सहा हजार भाविकांना सुरक्षित ठेवण्यात आले असल्याचे विक्रम नथानी म्हणाले. आज पासून पुन्हा आमची अमरनाथ यात्रा सुरू झाल्याची माहिती देखील त्यांनी खासदार नवनीत राणा यांच्याशी बोलताना दिली. खासदार नवनीत राणा यांनी अमरावतीकर सर्व भाविकांना शुभेच्छा दिल्या असून अमरनाथ गुहेत पोहोचल्यावर व्हिडिओ कॉल लावून आम्हालाही दर्शन घडवा असे, खासदार नवनीत राणा विक्रम नथानी यांच्याशी बोलताना म्हणल्या.