महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीतून युवास्वाभिमानच्या नवनीत राणा विजयी, आनंदराव आडसूळांचा पराभव - आनंदराव अडसूळ

अमरावती लोकसभा मतदारसंघात युवास्वाभिमानच्या नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. तर आनंदराव आडसूळांचा पराभव झाला आहे.

युवास्वाभिमानच्या नवनीत राणा विजयी, आनंदराव आडसूळांचा पराभव

By

Published : May 23, 2019, 6:03 AM IST

Updated : May 23, 2019, 8:57 PM IST

Live Updates-

  • 07.47 PM- नवनीत राणांचा विजय
  • 03.17 PM- नवनीत राणा 39,123 मतांनी आघाडीवर
  • 02.18 PM- नवनीत राणा 40,373 मतांनी आघाडीवर
  • 01.28 PM- आनंदराव अडसूळ - 2,03,339 नवनीत राणा - 2,13,774 मते
  • 02.18 PM- नवनीत राणा 28,839 मतांनी आघाडीवर
  • 01.28 PM- आनंदराव अडसूळ - 2,26,595 नवनीत राणा - 2,16,737 मते
  • 01.00 PM - नवनीत राणा 8,913 मतांनी आघाडीवर
  • 01.00 PM - नवनीत राणा 4,486 मतांनी आघाडीवर
  • 12.52 PM - आनंदराव अडसूळ - 1,52,336 नवनीत राणा - 1,43,035 मते
  • 12.50 PM - दोन ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड
  • 12.12 PM - आनंदराव अडसूळ - 1,20,885 नवनीत राणा - 1,15,061 मते
  • 11.15 AM - तिसरी फेरी - आनंदराव अडसूळ - 88336, नवनीत राणा - 87191 मते
  • 10.56 AM - आनंदराव अडसूळ - 59389, नवनीत राणा - 53319 मते
  • 09.40 AM - आनंदराव अडसूळ - 28335, नवनीत राणा - 24003 मते
  • 09.40 AM - आनंदराव अडसूळ - 28335, नवनीत राणा - 24003 मते
  • 08.41 AM - आनंदराव अडसूळ आघाडीवर
  • 08.00 AM - मतमोजणीला सुरुवात

अमरावती - अमरावती लोकसभा मतदारसंघात युवास्वाभिमानच्या नवनीत राणा यांचा विजय झाला आहे. यासाठी नेमानी गोडाऊन, अमरावती या ठिकाणी मतमोजणी पार पडली. या ठिकाणी सुरक्षेच्यादृष्टीने चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यावेळी अमरावती मतदारसंघात 60.36 टक्के मतदान झाले होते. तर हा मतदारसंघ अनुसुचित जातीसाठी राखीव होता. यावेळी शिवसेनेचे आनंदराव अडसूळ आणि काँग्रेस, राष्ट्रवादीचा पाठिंबा असलेल्या युवा स्वाभिमानच्या नवनीत-कौर यांच्यामध्ये खरी लढत पाहायला मिळाली.

अमरावतीतून युवास्वाभिमानच्या नवनीत राणा विजयी, आनंदराव आडसूळांचा पराभव

राज्यात यावेळी वंचित बहुजन आघाडीने आपले उमेदवार लोकसभेच्या रिंगणात उतरवल्यामुळे अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती पाहायला मिळाल्या. त्याचप्रमाणे अमरावती मतदारसंघातही वंचित बहुजन आघाडीचे गुणवंत देवपारे रिंगणात होते. मात्र, 2014 च्या लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर दांडगा जनसंपर्क वाढवणाऱ्या नवनीत राणा शिवसेनेचे विद्यमान खासदार अडसूळ यांचातच थेट लढत झाली. आता या चुरशीच्या लढतीत नवनीत राणांचा विजय झाला आहे.

2009 पासून अमरावती मतदारसंघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव झाल्याने मूळ साताऱ्याचे असणारे शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ राखीव असणाऱ्या अमरावतीत आले. पहिल्या निवडणुकीत त्यांनी डॉ. राजेंद्र गवई यांचा पराभव केला. 2014 च्या निवडणुकीत अमरावती लोकसभा मतदारसंघासाठी 62.98 टक्के मतदान झाले होते. तर त्यावेळी अडसुळांना 4 लाख 67 हजार मते मिळली होती. तर नवनीत राणा यांना 3 लाख 21 हजार 280 मतांवर समाधान मानावे लागले होते.

Last Updated : May 23, 2019, 8:57 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details