महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत नरबळीच्या उद्देशानं 'वार' करण्यात आलेल्या प्रथमेशची 'कहानी'; वाचा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

अमरावतीच्या मानखडी परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ एका छोट्याशा घरात सगणे कुटुंबीय राहत होते. ते शहरात मिळेल ते काम करुन पोट भरत होते. 2016 साली पिंपटळखुंटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमात प्रथमेश सगणे शिक्षण घेत होता. तेव्हा प्रथमेश याचा नरबळी देण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून प्रथेमश बचावला. मात्र, नरबळीच्या प्रयत्नात त्याचा आवाज कायमचा गेला.

अमरावतीत नरबळीच्या उद्देशानं 'वार' करण्यात आलेल्या प्रथमेशची 'कहानी'; वाचा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

By

Published : Jun 18, 2019, 5:04 PM IST

Updated : Jun 18, 2019, 8:08 PM IST

अमरावती- धामणगाव रेल्वे तालुक्यातील शंकर महाराज यांच्या आश्रमातील विद्या मंदिरात चिमुकल्या प्रथमेश सगणेचा नरबळी देण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले होते. 2016 मध्ये घडलेल्या या घटनेने संपूर्ण राज्य हादरून गेले होते. या घटनेच्या निषेधार्त राज्यभर अनेक मोर्चे निघाले होते. मागील महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या प्रकरणी न्यायालयाने निकाल देत 2 आरोपींना सात वर्षाची शिक्षा सुनावली आहे. मात्र, या घटनेत मृत्यूवर विजय मिळवण्याऱ्या प्रथमेश सगणे याला आपला आवाज कायमचा गमवावा लागला. याचा आढावा घेणारा हा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट....

अमरावतीत नरबळीच्या उद्देशानं 'वार' करण्यात आलेल्या प्रथमेशची 'कहानी'...पहा ईटीव्ही भारतचा स्पेशल रिपोर्ट...

अमरावतीच्या मानखडी परिसरातील अण्णाभाऊ साठे पुतळ्याजवळ एका छोट्याशा घरात सगणे कुटुंबीय राहत होते. ते शहरात मिळेल ते काम करुन पोट भरत होते. 2016 साली पिंपटळखुंटा येथील शंकर महाराजांच्या आश्रमात प्रथमेश सगणे शिक्षण घेत होता. तेव्हा प्रथमेश याचा नरबळी देण्याच्या उद्देशाने त्यांच्या गळ्यावर वार करण्यात आले. दैव बलवत्तर म्हणून प्रथेमश बचावला. मात्र, नरबळीच्या प्रयत्नात त्याचा आवाज कायमचा गेला.

दरम्यान, या घटनेला सुरूवातीला अपघात दाखवण्याचा प्रयत्न शंकर महाराज आश्रम शाळेच्या लोकांनी केला होता. नंतर या प्रकरणी नागरिकांमधून आवाज उठवला गेला. तेव्हा शाळा प्रशासनाकडून प्रथमेशवर चांगल्या रुग्णालयात उपचार करण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर मात्र, या कुटुंबाला नागपूरमध्ये बोलावून धमक्या दिल्याचा आरोप प्रथमेशच्या वडिलांनी केला आहे.
या घटनेनंतर तुम्हाला नोकरी देऊ तुमचे पुनर्वसन करू आणि प्रथमेशवर उपचार करून त्याला पुन्हा बोलके करू म्हणणाऱ्या शंकर महाराज आश्रमने या कुटुंबाला वारेवर सोडले आहे.

सध्या सगणे कुटुंबीय अमरावतीच्या मानखडी परिसरातील त्यांच्या एका नातेवाईकाकडे राहतात. त्यांचीही परिस्थिती बेताचीच आहे. अशा हलाकीच्या परिस्थीतीत जीवन जगणाऱ्या पीडित कुटुंबाकडे मात्र सर्वांचेच दुर्लक्ष होत आहे.

Last Updated : Jun 18, 2019, 8:08 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details