महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

शहराने पांगरली हिरवी चादर; अमरावतीत पावसाच्या बरसातीमुळे आल्हाददायी वातावरण

सलग बरसणाऱ्या रिमझिम तर कधी मुसळधार पावसामुळे शहराच्या पूर्व आणि दक्षिण दिशेने वेढलेल्या डोंगरावर हिरवळ बहरली आहे. रिमझिम पाऊस, पावसाने होणारा चिखल अनेक भागात पाहायला मिळत असून ओल्याचिंब झाडांच्या पानांवर साचलेले पावसाचे थेंब वातावरण प्रसन्न करीत आहेत.

अमरावती

By

Published : Jul 29, 2019, 8:13 AM IST

अमरावती - तीन दिवसांपासून बरसणाऱ्या पावसामुळे अमरावती शहरालगतच्या टेकड्यांवरील वृक्ष-वेली हिरवेगार झाले असून पावसाळ्यातील या हिरवळीमुळे अमरावती शहराने हिरवी चादर पांगरली असल्याचे भासत आहे.

पावसाने अनेक दिवस दडी मारल्याने संपूर्ण जून आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला अमरावती शहरालगतचा परिसर एप्रिल आणि मे महिन्यासारखाच रुक्ष वाटत वाटत होता. यावर्षी पावसाने चांगलीच वाट पाहायला लावली. 21 जूनला जिल्ह्यात मान्सूनचे आगमन झाले. मात्र, दमदार पाऊस 25 जुलैपर्यंत कधी बरसतो याची प्रतीक्षा अमरावतीकरांना होती. 25 जुलै पासून अमरावती शहर आणि जिल्ह्यात यावर्षी पहिल्यांदा पावसाळा लागला, असे जाणवत आहे.

अमरावती

सलग बरसणाऱ्या रिमझिम तर कधी मुसळधार पावसामुळे शहराच्या पूर्व आणि दक्षिण दिशेने वेढलेल्या डोंगरावर हिरवळ बहरली आहे. रिमझिम पाऊस, पावसाने होणारा चिखल अनेक भागात पाहायला मिळत असून ओल्याचिंब झाडांच्या पानांवर साचलेले पावसाचे थेंब वातावरण प्रसन्न करीत आहेत. चार महिन्यांचा उन्हाळा आणि जून आणि अर्ध्या जुलै महिन्यापर्यंत उकाडा सहन करणाऱ्या अमरावतीकरांना आता वातावरणात निर्माण झालेला गारवा अनुभवायला मिळत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details