अमरावती-"आदित्य ठाकरे यांना कोणतीही नोकरी नाही. मग त्यांच्या शपथ पत्रात एवढी संपत्ती आली कुठून? त्यांच्याकडे 18 कोटींची संपत्ती आहे. बीएमडब्ल्यू गाडी आहे. त्यामुळे आदित्य ठाकरे यांची चौकशी झाली पाहिजे, असे अमोल मिटकरी म्हणाले. अमरावतीच्या नेरपिंळाई गावात ते आमदार यशोमती ठाकूर यांच्या प्रचार सभेसाठी आले असता बोलत होते.
आदित्य ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? - अमोल मिटकरी - अमरावती विधानसभा मतदार संघ
"मुख्यमंत्री म्हणतात, 'आमच्या समोर कोणी पैलवान नाही'. मुख्यमंंत्र्यांच्या समोस कोणी पैलवान नाही तर ते एवढ्या सभा का घेतात. मुख्यमंत्र्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, म्हणून ते काहीही बोलत आहेत."
आदित्य ठाकरेंकडे एवढी संपत्ती आली कुठून? -अमोल मिटकरी
"मुख्यमंत्री म्हणतात, 'आमच्या समोर कोणी पैलवान नाही'. मुख्यमंंत्र्यांच्या समोस कोणी पैलवान नाही तर ते एवढ्या सभा का घेतात. मुख्यमंत्र्याच्या पायाखालची वाळू सरकली आहे. त्यांच्याकडे बोलण्यासाठी मुद्दे नाहीत, म्हणून ते काहीही बोलत आहेत. त्यांना विरोधी पक्ष संपवायचा आहे. मात्र, गोरगरीब जनता आमच्या पाठीशी आहे" असे मिटकरी म्हणाले.