महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

Ambedkar thinkers : 'असे' वक्तव्य म्हणजे शिक्षणाच्या क्षेत्रात कार्य केलेल्या महापुरुषांचा अपमान - आंबेडकरी विचारवंत - महापुरुषांचा अपमान

'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली होती,' असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील (chandrakant patil statement) यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. त्यावरुन सर्व स्तरातुन आंबेडकरी विचारवंतांनी (Ambedkar thinkers reaction on) टिकेची झोळ उठवत, आपले मत व्यक्त केले आहे.

Ambedkar thinkers
आंबेडकरी विचारवंत

By

Published : Dec 11, 2022, 7:46 PM IST

Updated : Dec 11, 2022, 8:28 PM IST

प्रतिक्रिया देतांना आंबेडकरी विचारवंत

अमरावती : शाळा सुरू करण्यासाठी महात्मा फुले, डॉ. आंबेडकर व कर्मवीर भाऊराव पाटील यांनी लोकांकडे भीक मागितली, असे वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी (chandrakant patil statement) औरंगाबाद येथील एका कार्यक्रमात केले होते. यावरून राज्यात नवा वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे तमाम आंबेडकरी जनतेत निषेधाचा सूर उमटत आहे. त्यांच्या या वक्तव्यावर काही तीव्र प्रतिक्रिया आंबेडकरी विचारवंतांनी (Ambedkar thinkers reaction on) दिल्या आहेत, काय त्या बघुया.



'हा तर मनुवादी विचार' किशोर बोरकर :डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा चालवण्यासाठी भीक मागितली, अशी चूकीची माहिती आणि दिशाभूल करणारी माहिती सांगणे चुकीचे असल्याचे मत, महाराष्ट्र काँग्रेस प्रदेश सरचिटणीस किशोर बोरकर यांनी व्यक्त केले. काँग्रेसचा एक कार्यकर्ता म्हणून सुद्धा मी या वक्तव्याचा पक्षाच्या वतीने निषेध करतो, असे त्यांनी यावेळी सांगितले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना संत गाडगेबाबांनी मुंबई येथील धर्म शाळेची जागा देऊ केली होती, असा दाखला सुद्धा त्यांनी यावेळी दिला. महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी जर त्याकडे शिक्षणाची दारे सर्वांसाठी उघडी केली नसती तर, आजची परिस्थिती अधिक विदारक राहिली असती असे त्यांनी सांगितले.


चंद्रकांत पाटील अधुऱ्या माहितीवर बोलले :शिंदे -फडवणीस सरकारमध्ये मंत्री असलेले चंद्रकांत पाटील यांनी महापुरुषांविषयी केलेले वक्तव्य हे अपुऱ्या माहितीच्या आधारे केले आहे . त्यांना बहुदा महापुरुषांचा इतिहास माहीत नसावा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्यावेळी सुपरस्टार दिलीप कुमार यांची मदत नाकारली होती. महात्मा ज्योतिराव फुले यांचे वडील अतिशय श्रीमंत होते. त्यामुळे त्यांनी त्याकाळी कुठल्याही मदतीची गरज नव्हती. महापुरुषांच्या कार्याची तत्कालीन परिस्थितीनुसार तुलनाच होऊ शकत नाही.


सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता - गेल्या काही दिवसांपासून भाजप नेत्यांकडून महापुरुषांबाबत वादग्रस्त विधाने होत आहेत. राज्यपाल भगत सिंह कोश्यारी, मंगलप्रभात लोढा, संजय गायकवाड यांच्यानंतर आता भाजप नेते चंद्रकांत पाटीलही या यादीत सामील झाले आहेत. शाळा सुरू करण्याकरता सरकारच्या अनुदानावर अवलंबून का राहता? असा सवाल करत चंद्रकांत पाटील यांनी वादग्रस्त विधान केलं आहे. 'महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांनी शाळा सुरू करण्यासाठी लोकांकडे भीक मागितली होती,' असं वादग्रस्त वक्तव्य चंद्रकांत पाटील यांनी एका कार्यक्रमात केलं आहे. यावरून राज्यात सर्वस्तरातून टीकेची झोड उठवण्यात येत आहे.

Last Updated : Dec 11, 2022, 8:28 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details