महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावतीच्या आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद

कोरोनाच्या धास्तीमुळे या दोन्ही मंदिरात भाविकांची गर्दी ओसरली होती. श्री अंबादेवी मंदिर संस्थानाने गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्याचे घोषित केले. तर, श्री एकवीरा देवी मंदिर संस्थानने आज कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

कौतुकास्पद
कौतुकास्पद

By

Published : Mar 20, 2020, 11:00 PM IST

Updated : Mar 20, 2020, 11:15 PM IST

अमरावती - शहराचे आराध्य दैवत असणार्‍या श्री अंबा आणि श्री एकवीरा या दोन्ही देवींचे मंदिर बंद करण्यात आले. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जिल्हा प्रशासनाने दिलेल्या निर्देशानुसार श्री अंबादेवी मंदिर संस्थान आणि श्री एकवीरादेवी मंदिर संस्थान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कौतुकास्पद! कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावतीच्या आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद

कोरोनाच्या धास्तीमुळे गेल्या काही दिवसांपासून या दोन्ही मंदिरात भाविकांची गर्दी ओसरली होती. श्री अंबादेवी मंदिर संस्थानाने गुरुवारी भाविकांना दर्शनासाठी मंदिर बंद करण्याचे घोषित केले. तर, श्री एकवीरा देवी मंदिर संस्थानने आज कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शासनाच्या पुढील आदेशापर्यंत मंदिर बंद ठेवण्यात येत असल्याचे जाहीर केले.

कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावतीच्या आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी अमरावतीच्या आराध्य दैवत अंबादेवी आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद

श्री अंबादेवी आणि एकवीरा देवीचे मंदिर बंद झाल्यामुळे मंदिर परिसरात आज शुकशुकाट पाहायला मिळाला. मंदिर बंद असल्यामुळे मंदिर परिसरातील फार फुलांच्या दुकानावर एकही ग्राहक पाहायला मिळाला नाही. तर, अनेकांनी आज आपली दुकानेही बंद ठेवली. दोन्ही मंदिर संस्थानच्या वतीने मंदिर बंद असतानाही स्वच्छतेची काळजी घेतली जात आहे.

मंदिर बंद असतानाही नियमित स्वच्छता

हेही वाचा - कमालच आहे!... आता बसस्थानकातील सॅनिटायझरच्या बाटल्याही गेल्या चोरीला

हेही वाचा - कोरोनाची धास्ती : गावी जाण्यासाठी परप्रातियांची पुणे रेल्वे स्थानकात तोबा गर्दी

Last Updated : Mar 20, 2020, 11:15 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details