अमरावती- जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. शुक्रवारी आणि शनिवारी जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे पेढी नदीच्या काठावर वसलेले संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील वृद्धांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आले आहे.
अमरावतीत पेढ नदीकाठावरील रहिवाशांना सतर्कतेचा इशारा; गाडगेबाबा वृद्धाश्रमातील वृद्धांचे स्थलांतर - विश्रोळी धरण चांदूर बाजार
मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरण तुडूंब भरले आहे. आता जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी पेढी नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे पेढी नदीला पूर येण्याची शक्यता आहे.
मुसळधार पावसामुळे चांदूर बाजार तालुक्यातील विश्रोळी धरण तुडूंब भरले आहे. आता जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. त्यामुळे या धरणाचे पाणी पेढी नदीत सोडण्यात येणार आहे. यामुळे पेढी नदीला पूर येण्याची शक्यता आहे. शहरापासून 9 किलोमीटर अंतरावर पेढी नदीच्या काठावर असणाऱ्या संत गाडगेबाबा वृद्धाश्रमातील 30 वृद्धांना सुरक्षीत स्थळी हलवण्याचे निर्देश जिल्हा प्रशासनाने दिले. त्यानुसार वृद्धाश्रमाचे संचालक कैलास बोरसे, व्यस्थापक अवकाश बोरसे, यशोवर्धन ठाकूर यांनी वृद्धाश्रमातील चौदा महिला आणि सोळा पुरुष वृद्धांना वृद्धाश्रमातून चांगपूर येथील हनुमान मंदिरात हलवले. वृद्धाश्रमच्या ३० पायऱ्यांपैकी ५ पायऱ्यांपर्यंत पाणी होते. आज सकाळी अमरावती शहरात पावसाचा जोर ओसरला आहे. मात्र, जिल्ह्यात सर्वत्र मुसळधार पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे.