अमरावती - जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध एकवीरा देवीचे मंदिर संस्थेने कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवले आहे. तर दुसरीकडे सार्वजनिक स्नेहभोजनावर तहसीलदार विश्वनाथ घुगे यांनी बंदी घातली आहे.
अंजनगाव सुर्जीतील एकविरा देवी मंदिर बंद, सार्वजनिक स्नेहभोजनावरही बंदी - सार्वजनिक स्नेहभोजनावरही बंदी
अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी येथील प्रसिद्ध एकवीरा देवीचे मंदिर संस्थेने कोरोना व्हायरसमुळे बंद ठेवले आहे. तसेच सार्वजनिक स्नेहभोजनावरही बंदी घालण्यात आली आहे.
अंजनगाव सुर्जीतील एकविरा देवी मंदिर बंद
अंजनगाव तालुक्यातील बोराळा गणपती मंदिरात बुधवारी दरवर्षीप्रमाणे चार ते पाच हजार लोकांचा विघ्नहर्ता ग्रुप तर्फे स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. परंतु सदर कार्यक्रमाची तहसीलदार यांना माहिती मिळताच तहसीलदार यांनी विघ्नहर्ता ग्रुपच्या प्रमुखाला सदर कार्यक्रम रद्द करण्याबाबत नोटीस दिली आहे. कोरोनामुळे स्थानिक प्रशासनाने दखल घेतली आहे.