महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

सध्या पश्चिम विदर्भातील ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे, अशा अनेक शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व पेरणीला सुरवात केली आहे. यामध्ये शेतकरी हे कपाशी व तुरीची लागवड करत असतात. ही पेरणी 20 मे च्या पुढे सुरू होते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जून महिन्यापासून या मान्सून पूर्व पेरणीला सुरुवात झाली आहे.

Agriculture department advises
पेरणीपूर्व मशागत अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांनी पेरणीसाठी घाई न करण्याचा कृषी विभागाचा सल्ला

By

Published : Jun 2, 2020, 8:46 AM IST

अमरावती - देशात मान्सून दाखल झाला असून, तो सध्या केरळमध्ये पोहचला असल्याने आता शेतकऱ्यांनी शेतात पेरणीसाठी लगबग सुरू केली आहे. काही शेतकऱ्यांची पेरणीपूर्व मशागत ही अंतिम टप्प्यात आली आहे. दरम्यान, समाधानकारक पाऊस झाल्याशिवाय शेतकऱ्यांनी शेतात पेरणीच करू नये, असा सल्ला कृषी विभागाच्या वतीने शेतकऱ्यांना देण्यात आला आहे.

संग्रहीत दृश्ये
सध्या पश्चिम विदर्भातील ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक पाणी आहे, अशा अनेक शेतकऱ्यांनी मान्सून पूर्व पेरणीला सुरवात केली आहे. या मध्ये शेतकरी हे कपाशी व तुरीची लागवड करत असतात. ही पेरणी 20 मे च्या पुढे सुरू होते. मात्र, यावर्षी कोरोनाचे सावट असल्याने जून महिन्यापासून या मान्सून पूर्व पेरणीला सुरुवात झाली आहे. मात्र, उत्पादन जास्त होईल या आशेने शेतकऱ्यांनी कुठल्याच पिकाची पेरणी करू नये. तसेच जोपर्यंत १०० मिली मीटर पाऊस व सहा ते सात इंच खोल ओलावा जात नाही तोपर्यंत पेरणी करु नये असे म्हणत १० जून नंतरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी असा सल्ला अमरावती जिल्हा कृषी अधिकारी विजय चव्हाळे यांनी शेतकऱ्यांना दिला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details