अमरावती -अखिल विश्वाला मानवतेचा संदेश देणारे वंदनीय राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांचा 53वा पुण्यतिथी महोत्सव अमरावती जिल्ह्यातील गुरुकुंज मोझरी येथील समाधीस्थळी पार पडत आहे. यादरम्यान अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर असलेले राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी गुरुकुंज मोझरी येथे थांबून तुकडोजी महाराजांच्या महासमाधीचे व प्रार्थना मंदिराचे दर्शन घेतले. तुकडोजी महाराजांनी अखिल अखिल विश्वाला जो मानवतेचा संदेश दिला. जी एक सर्वांना दिशा दिली आहे. आज महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर एक नवी प्रेरणा मिळाली, अशी प्रतिक्रिया त्यांनी यावेळी बोलताना दिली.
काय म्हणाले वळसे पाटील -
पुढे बोलताना गृहमंत्री वळसे पाटील म्हणाले 'तुकडोजी महाराजांनी आपल्या ग्रामगीतेच्या माध्यमातून समाजाला एक नवी दिशा, दृष्टी आणि प्रेरणा देण्याचा सातत्याने काम केले आहे. म्हणूनच त्यांच्या पुण्यतिथी महोत्सवाला दरवर्षी लाखो गुरुदेव भक्त हजेरी लावत असतात. याच पुण्यतिथी दरम्यान मला तुकडोजी महाराजांचे दर्शन करण्याची संधी मिळाली. त्यामुळे मी स्वतःला भाग्यवान समजतो, असेही ते म्हणाले.