अमरावती - शहरात मागच्या आठवड्यात शुक्रवारी पाऊस झाला होता. त्या पावसानंतर आज तब्बल नऊ दिवसांनी अमरावती शहरात पाऊसधारा बरसल्या आहेत. अमरावती जिल्हा प्रचंड दुष्काळाची झळ सहन करत होता. पावसाची प्रतीक्षा असताना दुपारी 2 वाजेपासून विजांच्या कडकडाटांसह मुसळधार पाऊस कोसळला.
नऊ दिवसांच्या खंडानंतर अमरावतीत बरसल्या पाऊसधारा.. - मुसळधार पाऊस
अमरावती शहर आणि जिल्हा प्रचंड दुष्काळाची झळ सहन करत होता.
शहरात पडलेला पाऊस
यापूर्वी 7, 9 आणि 21 जूनला शहरात पाऊस बरसला. मात्र, काही वेळातच आकाश निरभ्र होऊन ऊन पडले होते. पाऊस नसल्याने जिल्ह्यातील शेतीची कामेही ठप्प आहेत. मात्र, आज सकाळपासून आकाशात काळे ढग जमले. आणि शहरवासी पावसाची आतुरतेने वाट पाहत असताना आज दुपारी पावसाला सुरुवात झाली.