अमरावती -प्रजासत्ताक दिनी सुसाट दुचाकी चालवणाऱ्या चालकांवर पोलिसांची करड नजर असणार आहे. स्टंट करणाऱ्यांचे दुचाकी जप्त करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याचा सूचना अमरावती शहराचे पोलीस आयुक्त संजय कुमार बाविस्कर यांनी सर्व पोलीस अधिकाऱ्यांना केल्या आहेत.
प्रजासत्ताक दिनी स्टंट करणाऱ्यांवर होणार कारवाई, अमरावती पोलीस आयुक्तांच्या सूचना - स्टंटबाजीविरोधात कारवाई अमरावती
अमरावतीमध्ये दोन ते तीन वर्षांपासून प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दुचाकी चालवणारे तरुणाचे अनेक टोळके हे रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसत आहे. यामध्ये अति वेगाने वाहन चालविणे, बाईक रेसिंग, वाहन रस्त्यावर गोल फिरवून स्टंट करणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी शहरात मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच तरुणाईमध्ये मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येतो. अनेक शाळांचेय प्रभातफेऱ्या रस्त्याने जात असताना काही दुचाकी चालक हे अतिवेगाने वाहन चालवत स्टंटबाजी करत असतात. त्यामुळे दरवर्षी लहान-मोठे अपघात होत असतात. त्याला आळा बसावा म्हणून स्टंटबाजी करणाऱ्या दुचाकी चालकांवर कारवाई करण्याच्या पोलिसांना देण्यात आल्या.
दोन ते तीन वर्षांपासून प्रजासत्ताक व स्वातंत्र्यदिनी सकाळी आठ वाजताच्या दरम्यान दुचाकी चालवणारे तरुणाचे अनेक टोळके हे रस्त्यावर धिंगाणा घालताना दिसत आहे. यामध्ये अति वेगाने वाहन चालविणे, बाईक रेसिंग, वाहन रस्त्यावर गोल फिरवून स्टंट करणाऱ्या चालकांवर कारवाई होणार आहे.