महाराष्ट्र

maharashtra

कोरोनाकाळात अमरावतीत ९ हजार वाहनांवर कारवाई...

By

Published : Jul 10, 2020, 5:09 PM IST

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात येणाऱ्या वाहनचालकांची ठिकठिकाणी पोलीसांच्या वतीने कसून चौकशी करण्यात येत आहे.

action-on-9000-vehicles-in-amravati-during-corona-period
कोरोनाकाळात अमरावतीत ९ हजार वाहनांवर कारवाई...

अमरावती -अमरावती शहरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागरिकांना आवाहन करूनही ते विनाकारण घराबाहेर पडत आहेत. त्यामुळे नियमांची पायमल्ली करणाऱ्या नागरिकांवर अमरावती वाहतूक पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे. १ जून ते १० जुलै दरम्यान तबल ९ हजार वाहनांवर कारवाई करण्यात आली आहे. यात साडे बारा लाखांचा दंड वसूल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

कोरोनाकाळात अमरावतीत ९ हजार वाहनांवर कारवाई...

कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनाने नियम तोडणाऱ्या नागरिकांवर कडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. शहरात येणाऱ्या वाहनचालकांची ठिकठिकाणी पोलीसांच्या वतीने कसून चौकशी करण्यात येत आहे. नागपूरकडून किंवा इतर ग्रामीण भागातून येणाऱ्या वाहन धारकांच्या वाहनांची तपासणी वेलकम पॉईन्टला केली जात आहे. दुचाकी व चारचाकी वाहन धारकांना मास्क लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. अमरावती शहर वाहतूक पोलिसांकडून मागील ४० दिवसांच्या कारवाईत ९ हजार वाहनांवर कारवाई केली आहे. यात साडे बारा लाखांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

हेही वाचा-रासायनिक खतांचा असाही दुष्परिणाम; ओडिशाच्या बरगढमध्ये आहेत सर्वाधिक कर्करोग रुग्ण...

ABOUT THE AUTHOR

...view details