महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ट्रक आणि कारचा भीषण अपघात, आई वडिलांसह चिमुकली गंभीर - नांदगांवपेठ

नागपूरवरून भरधाव येणाऱ्या कार आणि ट्रकचा नांदगावपेठ नजीकच्या व्यंकटेश पेट्रोलपंप नजीक भीषण अपघात झाला. या अपघातात आई वडिलांसह अडीच वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली असून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भीषण अपघात

By

Published : Sep 6, 2019, 11:41 PM IST

अमरावती - नागपुरवरून भरधाव येणाऱ्या कार आणि ट्रकचा नांदगावपेठ जवळच्या व्यंकटेश पेट्रोलपंपानजीक भीषण अपघात झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७ वाजताच्या दरम्यान घडली. घटनेत आई वडिलांसह अडीच वर्षीय चिमुकली गंभीर जखमी झाली असून जखमींना उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले.


गाडगे नगर येथील रहिवासी विशाल धामणकर हे आपल्या कुटुंबीयांसह नागपूर येथून त्यांच्या कार (एम.एच.१५, सी.ए.१२५) ने अमरावतीला परत येत होते. दरम्यान व्यंकटेश पेट्रोल पंप नांदगावपेठ नजीक ट्रक (एम.एच. १८, बी.जी. २३२४) ने अचानक वळण घेतल्याने भरधाव कार ट्रकमध्ये शिरली. या घटनेमध्ये विशाल धामणकर (३४),पत्नी सोनाली धामणकर(२६) मुलगी दीप्ती धामणकर (अडीच वर्षे) गंभीर जखमी झालेत. जखमींना आयआरबीच्या रुग्णवाहिकेने जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details