अमरावती - परप्रांतीय मजुरांना लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका बसला आहे. मजूर आपल्या घरी परतण्यासाठी अंत्यत जीवघेणा प्रवास करत आहेत. आज अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरून एका ट्रकमध्ये ६० ते ७० मजूर, एका लहान मालवाहू गाडीमध्ये २८ मजूर जनावरासारखे कोंबून भरल्याप्रमाणे प्रवास करत असल्याचे पाहायाल मिळाले.
अमरावती नागपूर महामार्गावरून परप्रांतीय मजुरांचा ट्रकमधून जीवघेणा प्रवास
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे. काम बंद झाल्याने परराज्यातील मजूर हे आपल्या राज्यात मिळेल त्या वाहनांनी जात आहेत. ट्रकमध्ये जीव धोक्यात घालून कोंबून प्रवास करीत आहेत. अमरावती नागपूर महामार्गावरून अशा मजुरांची दररोज वाहतूक होत आहे.
गेल्या दीड महिन्यापासून लॉकडाऊनची स्थिती आहे. काम बंद झाल्याने परराज्यातील मजूर हे आपल्या राज्यात मिळेल त्या वाहनांनी जीव धोक्यात घालून प्रवास करीत आहेत. अमरावती नागपूर महामार्गावरून अशा मजुरांची दररोज वाहतूक होत आहे. मुंबई, पुणे आणि औरंगाबाद येथे अडकलेल्या सर्व परप्रांतीय मजूर जीवघेणा प्रवास करत घरी निघाले आहेत. आज एका ट्रकमधून ६० त ७० मजूर, तर एका लहान मालवाहूमधून २८ मजूर प्रवास करत होते. हाताला काम नाही, खायला अन्न नाही. आमच्याकडे पैसे नाहीत, त्यामुळे असा प्रवास करत असल्याचे त्यांनी सांगितले.