अमरावती- मागील वर्षीच्या तुलनेत १० दिवस अगोदर दाखल झालेल्या मान्सूनमुळे मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी लगबगीने पेरणी सुरू केली होती. दरम्यान आता पश्चिम विदर्भातील पाच जिल्ह्यात जवळपास २१ लाख हेक्टर शेतीवरील जमिनीत शेतकऱ्यांनी पेरणी केली असून ६५ टक्के पेरणी पूर्ण झाली आहे. काही भागात पावसाने दडी मारल्याने पश्चिम विदर्भातील ३५ टक्के शेतकरी हे अद्यापही पावसाच्या प्रतीक्षेत असल्याने पेरणी थांबली आहे. दरम्यान अकोला जिल्ह्यात केवळ २६ टक्केच पेरणी झाली आहे. त्यामुळे ७४ टक्के क्षेत्रातील पेरणी बाकी असल्याने शेतकरी चिंतेत सापडला आहे.
यावर्षी खरीप हंगामासाठी पश्चिम विदर्भातील बुलडाणा, अकोला, वाशीम, अमरावती, यवतमाळ या पाच जिल्ह्यातील सरासरी ३२ लाख २८ हजार एवढ्या क्षेत्रफळावर पेरणी अपेक्षित होती. त्यापैकी या पाच जिल्ह्यात आतापर्यंत २१ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिम विदर्भात दरवर्षी सोयाबीन पिकाची लागवड ही मोठ्या प्रमाणावर केली जाते. यावर्षी सुद्धा जवळपास ९ लाख ६६ हजार हेक्टरवर शेतकऱ्यांनी सोयाबीन पेरणी केली आहे. तर त्या पाठोपाठ ७ लाख ५७ हजार हेक्टरवर कापसाची लागवडही केल्या गेली आहे.
जिल्हानिहाय पेरणी क्षेत्र
बुलडाणा- ७५%