महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

भरधाव वाहनाने मायलेकीला चिरडले; 6 वर्षीय चिमुकली ठार - धामणगाव रेल्वे news

आपल्या घरासमोर खेळत असणाऱ्या मुलीला बोलावण्यासाठी गेलेल्या आईला व खेळणाऱ्या मुलीला भरधाव चारचाकी वाहनाने चिरलडले. यात ६ वर्षीय मुलीचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला तर मुलीची आई गंभीर जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहे. ही घटना अमरावतीच्या धामणगाव रेल्वे लगत असलेल्या दत्तापूर गावात घडली.

मृत सिद्धी पतालीया

By

Published : Sep 23, 2019, 11:46 PM IST

अमरावती- आपल्या घरासमोर खेळत असणाऱ्या मुलीला बोलावण्यासाठी गेलेल्या आईला व खेळणाऱ्या मुलीला भरधाव चारचाकी वाहनाने चिरडल्याची घटना आज (सोमवार) सायंकाळी सात वाजताच्या सुमारास अमरावतीच्या धामणगाव रेल्वे लगत असलेल्या दत्तापूर गावात घडली. यात सहा वर्षीय चिमुकली सिद्धी पंकज पतालीया हिचा मृत्यू झाला असून आई गंभीर जखमी झाली आहे.

दत्तापूर पोलीस ठाणे

आज सायंकाळी सातच्या सुमारास सिद्धी ही घराजवळ खेळत होती. याच दरम्यान तिला बोलावण्यासाठी तिची आई गेली असताना याच वेळी शहरातून यवतमाळकडे जाणाऱ्या एका अज्ञात चारचाकी गाडीने मायलेकीला उडवले. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने तिचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर तिच्या आईवर उपचार सुरू आहेत.

हेही वाचा - चारचाकी-दुचाकीची समोरासमोर धडक, दुचाकीने घेतला पेट

ABOUT THE AUTHOR

...view details