महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावती येथे महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा - दर्यापूर येथे ऑपरेशन

मूर्तिजापूर तालुक्यातील अंदुरा येथील नागरिकांनी पोटाच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी अमरावती, अकोला, मुर्तीजापुर व अन्य ठिकाणी बरेच वेळा चक्रा मारल्या. परंतु, कुठेही रुग्णांना उपचार होऊ शकला नाही. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे नवजीवन हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी सांगण्यात आले. या सोनोग्राफीत पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले.

5 kg lump removed from a woman's abdomen at Daryapur, Ambravali
अमरावती येथे महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा

By

Published : Jun 10, 2021, 4:36 AM IST

अमरावती - अकोला जिल्ह्यातील मूर्तिजापूर तालुक्यातील अंदुरा येथील ३८ वर्षीय महिलेच्या पोटात गेल्या एक वर्षापासून त्रास सुरू होता. या महिलेची सोनोग्राफी केल्यानंतर पोटात गोळा असल्याचे निदर्शनात आले. जिल्ह्यातील दर्यापूर येथील नवजीवन रुग्णालयात या महिलेच्या पोटावर शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी तीच्या पोटातून चक्क पाच किलोचा गोळा काढल्याची घटना घडली आहे.

अमरावती येथे महिलेच्या पोटातून काढला ५ किलोचा गोळा

तब्बल दोन तास शस्त्रक्रिया -

मूर्तिजापूर तालुक्यातील अंदुरा येथील नागरिकांनी पोटाच्या त्रासावर उपचार घेण्यासाठी अमरावती, अकोला, मुर्तीजापुर व अन्य ठिकाणी बरेच वेळा चक्रा मारल्या. परंतु, कुठेही रुग्णांना उपचार होऊ शकला नाही. अखेर रुग्णांच्या नातेवाईकांना अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर येथे नवजीवन हॉस्पिटल येथे उपचार घेण्यासाठी सांगण्यात आले. रुग्णाला 8 जून रोजी त्यांना उपचारासाठी दाखल करुन रुग्णाची सोनोग्राफी करण्यात आली. त्यामध्ये रुग्णाच्या पोटात मोठा गोळा असल्याचे दिसून आले. त्यानंतर डॉक्टर रवींद्र साबळे यांनी परतवाडा डॉक्टर सुरेंद्र बरडिया यांच्या मदतीने रुग्णावर तब्बल दोन तास शस्त्रक्रिया करून रुग्णाच्या पोटातून पाच किलोचा गोळा काढला.

डॉक्टरांचे कौतुक -

सध्या रुग्णांची प्रकृती ही व्यवस्थित आहे. तालुक्याच्या ठिकाणी एवढे मोठे ऑपरेशन यशस्वीरित्या पार पडल्याने डॉक्टरांचे व त्यांच्या कर्मचाऱ्यांची रुग्णांच्या नातेवाइकांकडून कौतुक करण्यात आले. रुग्णांवर डॉक्टर सुरेंद्र बरडिया, डॉक्टर रवींद्र सावळे, डॉक्टर माधुरी साबळे, डॉक्टर योगेश वानखडे यांच्या सहकार्याने यशस्वीरित्या रुग्णांवर उपचार करण्यात आला.

हेही वाचा - अभिनेत्री ते खासदार.. असा आहे नवनीत राणा यांचा प्रवास, 'मोची' की 'लुभाणा' सर्वोच्च न्यायालय ठरवणार

ABOUT THE AUTHOR

...view details