महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अमरावतीत प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन चौथ्या दिवशीही सुरूच, रस्ता बंद असल्याने नागरिकांची गैरसोय - अमरावती

आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाकाची व्यवस्था केली. बुधवारी रात्री सरकारकडून आंदोलकांना एक पत्र देण्यात आले असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे.

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन

By

Published : Feb 14, 2019, 11:03 AM IST

अमरावती - विदर्भ बळीराजा प्रकल्पग्रस्त कृती समीतीच्या नेतृत्वात अमरावती विभागातील प्रकल्पग्रस्तांची तिसरी रात्रही रस्त्यावरच निघाली आहे. सोमवारी इर्विन चौकातून विभागीय कार्यालयावर निघालेल्या प्रकल्पग्रस्तांच्या मोर्चाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर रास्तारोको आंदोलन केले.

प्रकल्पग्रस्तांचे आंदोलन
हे आंदोलन बुधवारी तिसऱ्या दिवशीही कायम राहिले असून शासन आणि प्रशासनाकडून या आंदोलनाची दखल घेतली जात नसल्याने आंदोलक आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. अमरावतीसह अकोला, वाशिम, यवतमाळ येथील प्रकल्पग्रस्तही या आंदोलनात सहभागी झाले आहेत.

डिसेंबर २०१३ पर्यंत अल्पदरात जमिनी खरेदी केलेल्या खरेदीदारक शेतकऱ्यांना २०१३ च्या कायद्याच्या तरतुदीनुसार मोबदला देण्यात यावा, प्रकल्पक्षेत्र विस्थापितांचे पुनर्वसन २०१३च्या कायद्यानुसार करण्यात यावे. प्रकल्पग्रस्तांना शासकीय सेवेत सामावून घेण्याची कायदेशीर तरतूद ५ टक्क्यावरून १५ टक्के करण्यात यावी, अशा विविध मागण्या प्रकल्पग्रस्तांनी केल्या आहेत.

आंदोलकांच्या मागण्यांची दखल सरकारने घेतली नसल्याने सोमवार आणि मंगळवारची रात्र आंदोलनस्थळीच आंदोलकांनी घालविली. आंदोलकांनी रस्त्यावरच स्वयंपाकाची व्यवस्था केली. बुधवारी रात्री सरकारकडून आंदोलकांना एक पत्र देण्यात आले असून मंत्रिमंडळाच्या पुढील बैठकीत प्रकल्पग्रस्तांच्या मागण्यांवर निर्णय घेऊ असे आश्वासन दिले. आंदोलकांनी आपल्या मागण्या पूर्ण होईस्तोवर आंदोलन सुरूच राहील, अशी भूमिका घेतली आहे. आंदोलकांनी दिवसभर आंदोलन केल्यावर रात्री भजनाचा कार्यक्रम आंदोलनस्थळी घेतला. दरम्यान, अतिशय महत्वाचा रस्ता सलग ३ दिवसांपासून बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details