अमरावती : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी अर्ज वैध ठरलेल्या 33 उमेदवारांपैकी आज नामनिर्देशन पत्रे मागे घेण्याच्या दिवशी 10 उमेदवारांकडून अर्ज मागे घेण्यात आले. त्यामुळे आता उर्वरित 23 उमेदवार निवडणूक लढविणार आहेत.
दहा उमेदवारांचे अर्ज मागे :गोपाल सुखदेवराव वानखेडे, मधुकर दिगांबर काठोळे, प्रा. डॉ. प्रफुल्ल अजाबराव राऊत, राजेश मोतीराम दांदडे, ॲड. सिध्दार्थ मारोतराव गायकवाड, राजेश सोपान गावंडे, किरण अर्जुन चौधरी, पांडुरंग तुकारामजी ठाकरे, नामदेव मोतीराम मेटांगे, मीनल सचिन ठाकरे अशी उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या व्यक्तींची नावे आहेत.
23 उमेदवार निवडणूक लढविणार :धीरज रामभाऊ लिंगाडे (इंडियन नॅशनल काँग्रेस), डॉ. रणजीत विठ्ठलराव पाटील (भारतीय जनता पार्टी), अनिल ओंकार अमलकार (वंचित बहुजन आघाडी), डॉ. गौरव रामदास गवई (बहुजन भारत पार्टी), तर अपक्ष म्हणून अनिल वकटूजी ठवरे, अनंतराव राघवजी चौधरी, अरुण रामराव सरनाईक, ॲड. आनंद रविंद्र राठोड, धनराज किसनराव शेंडे, ॲड. धनंजय मोहनराव तोटे, निलेश दिपकपंत पवार (राजे), उपेंद्र बाबाराव पाटील, शरद प्रभाकर झांबरे पाटील, श्याम जगमोहन प्रजापती, डॉ. प्रविण रामभाऊ चौधरी, प्रविण डिगांबर बोंद्रे, भारती ख. दाभाडे, माधुरी अरुणराव डाहारे, संदेश गौतमराव रणवीर, लक्ष्मीकांत नारायण तडसे, विकेश गोकुलराव गवाले, सुहास विठ्ठलराव ठाकरे, संदीप बाबुलाल मेश्राम अशी निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांची नावे आहेत.