अमरावती- रंगोली लॉनमागे एका अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला. ही मुलगी मंगळवारी इमारतीवरून पडली होती. तिचा उपचारादरम्यान आज रेडिएंट रुग्णालयात मृत्यू झाला.
अमरावतीत इमारतीवरून पडून १४ वर्षीय मुलीचा मृत्यू - अमरावती
रंगोली लॉनमागे एका अपार्टमेंटच्या टेरेसवरून पडून १४ वर्षांच्या मुलीचा मृत्यू झाला.
इंद्रायणी विनोद खोकले (१५) असे मृत मुलीचे नाव आहे. मंगळवरी सकाळी इंद्रायणी ३ मजली असणाऱ्या गुरुकृपा अपर्टमेंटच्या गच्चीवर बसली असताना अचानक खाली पडली. इंद्रायणी खाली पडताच अपर्टमेंटमध्ये एकच खळबळ उडाली. इंद्रायणी खाली पडली तेव्हा घरात आई एकटीच होती. वडील लग्नाला गेले होते, तर बहीण परीक्षा द्यायला गेली होती. इंद्रायणी गणेशदास राठी विद्यालयात नवव्या वर्गात होती. इंद्रायणीला त्वरित जिल्हा समान्य रुग्णालयात हलविण्यात आले होते. जिल्हा सामान्य रुग्णालयात प्राथमिक उपचारानंतर तिला रेडिएंन्ट रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले होते. ३ दिवसांच्या उपचारानंतर आज इंद्रायणीची प्राणज्योत मालवली.