महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ही आहे महाराष्ट्राची "निरजा", अमरावतीच्या या लेकीने 129 भारतीयांना सुखरुप मायदेशी आणले - shweta shanke play key role in evacuation process

अफगाणिस्तानातील भयावह वतावरणात श्वेताने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. अफगणिस्थानामधील स्फोटक स्थिती बघता आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे, तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणे या एकमेव ध्येयातून सर्वच कामी लागले होते.

shweta shanke
श्वेता शंके

By

Published : Aug 18, 2021, 8:18 AM IST

Updated : Aug 18, 2021, 6:52 PM IST

अमरावती -अफगाणिस्तानावर तालिबानने नियंत्रण मिळवले आहे. अशा परिस्थितीत अफगाणिस्तानात असणाऱ्या 129 भारतीयांना घेऊन दर्यापूर येथील हवाई सुंदरी एअर इंडियाच्या विशेष विमानाने भारतात पोहोचली. काबुल येथील बिकट परिस्थितीचा सामना करीत या विमानाचे भारतात आगमन झाले.

2017-18 मध्ये श्वेता झाली हवाई सुंदरी -

दर्यापूरच्या बाभळी येथील शिवाजी चौक परिसरात श्वेता शंके लहानाची मोठी झाली. तिचे वडील शिक्षक म्हणून जिल्हा परिषद शाळेतून सेवानिवृत्त झाले आहेत. तिची बहीण दर्यापुरातच दंतरोगतज्ज्ञ असून भाऊ फार्मासिस्ट आहे. 2017-18 मध्ये श्वेताची निवड भारतीय हवाई दलात हवाई सुंदरी म्हणून झाली होती. सध्या ती दिल्ली विमानतळावर सेवेत आहेत.

श्वेताने समर्थपणे हाताळली परिस्थिती -

अफगाणिस्तानातील भयावह वतावरणात श्वेताने समर्थपणे संपूर्ण परिस्थिती हाताळली. अफगणिस्थानामधील स्फोटक स्थिती बघता आपल्या जीवाची पर्वा न करता भारतीयांची सुटका करणे, तसेच त्यांना सर्वतोपरी मदत करणे या एकमेव ध्येयातून सर्वच कामी लागले होते. भारतीयांना मायदेशी आणण्यासाठी प्रसंगी प्राण गेले तरी चालेल ही ऊर्मी बाळगत कार्य करण्यात आले. या मिशनमध्ये सुमारे 129 भारतीयांना मायदेशी आणण्यात यश प्राप्त झाले आहे. यामध्ये सहभागी असणार्‍या श्वेताचे व तिच्या परिवाराचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

श्वेता शंके हिच्या आईबाबा याबाबत माहिती देताना

हेही वाचा -संकटकाळात भारताचा मदतीचा हात... अफगाणिस्तानी नागरिकांकरिता आपत्कालीन ई-व्हिसा जाहीर

यशोमती ठाकूर यांनी साधला संवाद -

अफगाणिस्तातून 129 भारतीयांना सुखरूप भारतात आणणाऱ्या श्वेतासोबत अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. यशोमती ठाकूर यांनी अफगाणिस्ताची परिस्थिती नेमकी कशी होती याची चौकशी केली. काही अडचण आल्यास माझ्याशी संपर्क साद, असे म्हणत मंत्री ठाकूर यांनी श्वेताचे अभिनंदन केले.

अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी श्वेता शंकेसोबत संवाद साधला
Last Updated : Aug 18, 2021, 6:52 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details