अमरावती -लोकांचे कपडे धुणारा धोबी ते आता तबल 123 बेवारस, अनाथ, दिव्यांग मुलांचा बाप हा जीवनप्रवास आहे.अमरावती जिल्ह्यातील वझ्झर येथील जेष्ठ समाजसेवक श्री शंकरबाबा पापळकर हे मूळचे अमरावती जिल्ह्यातील अचलपूर तालुक्यात राहणारे त्यांचे पूर्वी कपडे धुण्याचे दुकाने होते. तरुण वयापासूनच समाजासाठी जागी तरी भरीव काम करण्याची इच्छा होती. म्हणून त्यांनी पत्रकारिता हे क्षेत्र निवडले. त्यांनी अनेक वृत्तपत्रात काम देखील केले. त्यानंतर त्यांनी स्वतःचे देवकीनंदन गोपाला हे मासिक सुरू केले. या माध्यमातून ते अनेक राजकिय, सामाजिक, अधिकारी अशा सर्व क्षेत्रातील लोकांसोबत जोडल्या गेले. पत्रकार असल्याने त्यांची चहुबाजूंनी नजर असायची. रेल्वे स्टेशन, बस स्थानक आदी परिसरात त्यांना अनेकदा बेवारस, मतिमंद, दिव्यांग, अनाथ मुले दिसून यायची त्यामुळे त्यांनी त्या मुलांचा सांभाळ करण्याचे ठरवले. आज एक दोन नव्हे तर तबल 123 मुलांचे बाप म्हणून या शंकर बाबा पापळकर यांची सगळीकडे ओळख आहे.
पत्रकार असतांना अशाच चार बेवारस बालकांना घेऊन शंकर बाबा पापळकर यांनी अमरावती गाठली. 1995च्या दरम्यान हनुमान व्यायाम प्रसारक मंडळाचे पद्मश्री प्रभाकर वैद्य यांच्या माध्यमातून त्यांनी अचलपूर जवळच्या वझ्झर येथे स्वर्गीय अंबादास वैद्य अनाथ, दिव्यांग, अंध, बेवारस मुलासाठी बालगृह सुरू केले. या बालगृहात जवळपास 200 मूल होते. त्यातील अनेकांचे लग्न शंकरबाबा पापळकर यांनी लावून दिले. त्यामुळे आता सध्या या बालगृहात 123 मुले-मुली वास्तव्यास आहेत.
सर्व मुलांना आधार कार्ड -
शंकर बाबा यांच्याकडे दत्तक घेतलेल्या संपूर्ण 123 मुलांना त्यांच्या नावांचे आधार कार्ड देण्यात आले आहे. आधार कार्डचा समोर वडील म्हणून हे शंकरबाबा पापळकर यांचे नाव आहे. शासकीय योजनांचा लाभ या अनाथ मुलांना शंकर बाबांनी मिळवून दिलेला आहे. त्यामुळे शंकर बाबा हेच आमचे बाबा असल्याचे येथील अनाथ, दिव्यांग मुले सांगतात.
हेही वाचा -हिवरेबाजारचा आणखी एक 'आदर्श' निर्णय.. कोरोनाने सर्व शाळा बंद असताना गावात वाजली शाळेची घंटा
प्रत्येकाला मिळाला मतदानाचा हक्क -