अकोला- दुचाकीची सीट फाडल्याच्या संशयातून चार मारेकऱ्यांनी तरुणावर चाकूने वार करत खून केला. ही घटना पातूर पोलीस ठाण्याच्या परिसरातील मुजावरपुरा येथे मंगळवारी रात्री घडली. नदीम शाह नईम शाह असे मृत तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी शेख जुबेर कुरेशी, शेख दस्तगीर शेख शेरू, शेख शारीक कुरेशी, शेख कय्युम कुरेशी, शेख दानिश शेख दस्तगिर या आरोपींना अटक केली आहे.
दुचाकीची सीट फाडल्याच्या संशयातून तरुणाचा खून; चौघांना अटक
मुजावरपुरा येथे दुचाकीची सीट फाडल्याच्या कारणावरून नदीम शाह नईम शाह याच्यावर चार मारेकऱ्यांनी चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात नदीम ठार झाला असून याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपींना अटक केली आहे.
दुचाकीची सीट फाडल्याच्या कारणावरून नदीम शाह नईम शाह याच्यासोबत वाद झाला. या वादातून नदीमवर चाकून प्राणघातक हल्ला करण्यात आला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या नदीमला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी एजाज शहा आयुब शहा यांनी पातूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपीविरोधात विविध कलमांनुसार गुन्हे दाखल केले.
पोलिसांनी शेख जुबेर कुरेशी, शेख दस्तगिर शेख शेरू, शेख शारीक कुरेशी, शेख कय्युम कुरेशी, शेख दानिश शेख दस्तगिर यांना अटक केली. उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रोहिणी सोळंके यांनी तत्काळ घटनास्थळावर दाखल होत घटनेचा आढावा घेतला आहे. पातूरचे ठाणेदार गजानन गुल्हाने पुढील तपास करत आहेत. रमजान महिन्याच्या काळात घडलेल्या या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.