महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोला : वन्यप्राण्यांकडून पिके फस्त - शेतकरी त्रस्त - वन्य प्राणी

एकीकडे पावसाची अवकृपा तर दुसरीकडे वन्य प्राण्यांचा त्रास या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतामधील पिकांना वन्य प्राणी आपले भक्ष्य बनवत असल्याने पीक हातात येण्याआधी ते जगवणे ही शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या आहे.

अकोला : पिके फस्त - शेतकरी त्रस्त

By

Published : Jul 25, 2019, 8:29 PM IST

अकोला - एकीकडे पावसाची अवकृपा तर दुसरीकडे वन्य प्राण्यांचा त्रास या दोन्ही गोष्टींमुळे शेतकरी हतबल झाला आहे. शेतामधील पिकांना वन्य प्राणी आपले भक्ष्य बनवत असल्याने पीक हातात येण्याआधी ते जगवणे ही शेतकऱ्यांसमोर मोठी समस्या आहे.

अकोला : पिके फस्त - शेतकरी त्रस्त

हरीण, रानडुक्कर, माकड, नीलगाय यांसारखे प्राणी शेतात उच्छाद घालत आहेत. पावसासोबतच वन्य प्राण्यांच्या नुकसानीचा फटका शेतकऱ्यांना बसत असल्याची स्थिती आहे.

ज्या ठिकाणी पाऊस कमी झाला त्या ठिकाणी बियाणे अतिशय कमी प्रमाणात उगवले आहे. त्यातही पिकांना वन्य प्राण्यांचा त्रास होत आहे. याबाबत शेतकऱ्यांनी केलेले उपाय देखील निरर्थक ठरत आहेत. वन्यप्राण्यांच्या उच्छादामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details