अकोला - तेल्हारा तालुक्यातील वान धरण शंभर टक्के भरले आहे. त्यामुळे या प्रकल्पाचे शनिवारी पहाटे चार दरवाजे 50 सेंटीमीटरने उघडण्यात आले. धरणातून 7 हजार क्यूसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे.
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे वान धरण भरले. मेळघाटचे जंगल आणि लगतच्या परिसरातील पाणी वान धरणाला येऊन मिळते. काही दिवसांपूर्वी धरणाचे दोन दरवाजे उघडले होते. मात्र, मागील 24 तासात वान धरणाच्या पाणी साठ्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याने आणखी चार दरवाजे उघडण्यात आले.