अकोला -अकोला शहर व परिसरातील गावांमध्ये सतत कथा वाचन, सप्ताह, भागवत तसेच किर्तनांचे कार्यक्रम सुरू असतात. या कार्यक्रमांना उपस्थित राहण्यासाठी तसेच कार्यक्रम आटोपून परत जाण्यासाठी उशीर झाला तर हभप महाराजांची निवासाची व्यवस्था नसते. अकोला शहरात महाराज आणि वारकऱ्यांचे निवासाची व्यवस्था व्हावी, यासाठी अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी जिल्ह्यातून येणाऱ्या गोरगरिबांच्या रुग्णांसोबत येणाऱ्या व्यक्तींच्या निवास व्यवस्थेकरिता सर्वधर्मीय वारकरी भवन निर्माण करावे, या मागणीचे निवेदन आज विश्व वारकरी सेनेच्या वतीने आमदार अमोल मिटकरी व निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांना देण्यात आले.
अकोला शहरात मध्यवर्ती ठिकाणी वारकरी भवन द्या; विश्व वारकरी सेनेची मागणी वारकऱ्यांच्या सोयीसाठी वारकरी भवन निर्माण करावे-
पंढरपूर आणि इतर धार्मिकस्थळीं वारकऱ्यांना राहण्यासाठी मठांची आणि विविध संस्थानद्वारे निवास व्यवस्था केलेली आहे. अकोल्यात मात्र तशी व्यवस्था नाही. त्यामुळे अकोल्यात वारकऱ्यांच्या सोयीसाठी वारकरी भवन निर्माण करण्यात यावे.
पूर्णामाय दूषित होण्यापासून वाचवावी-
तसेच शेतकऱ्यांची तारणहार असलेली पूर्णा नदी ही संपूर्ण जिल्ह्यातील जनतेची श्रध्दास्थान आहे. त्या नदीला मात्र जनतेकडून सतत दूषित करण्याचे काम सुरू असते. जिल्ह्यातील लोकांच्या मृत्यूनंतर रक्षा विसर्जन करण्यासाठी पूर्णा मातेचीच निवड केली जाते. त्यामुळे नदीतील पाणी दूषित होत असते तेच पाणी तीर्थ म्हणून लोक मोठ्या श्रद्धेने पित असतात. हा प्रकार थांबावा म्हणून पूर्णा नदी काठावर एक राक्षा विसर्जन कुंडाचे बांधकाम करावे. पूर्णामाय दूषित होण्यापासून वाचवावी, अशीही मागणी विश्व वारकरी सेनेने केली आहे. यावेळी विश्व वारकरी सेनेचे राज्यअध्यक्ष हभप गणेश महाराज शेटे यांचे समवेत आदी उपस्थित होते. सर्व महाराज मंडळींनी आमदार अमोल मिटकरी यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. या समस्या मार्गी लावण्याची विनंती केली.
हेही वाचा-पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना कोरोनाची लागण