प्रकाश आंबेडकर प्रतिक्रिया व्यक्त करताना अकोला : काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांना दोन वर्षांची शिक्षा न्यायालयाने ठोठावली. न्यायालयाच्या या निर्णयानंतर राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यपदही रद्द करण्यात आले आहे. राहुल गांधी यांच्या उच्च न्यायालयातील जाण्याची वाट ही न पाहता त्यांच्यावर करण्यात आलेली ही कारवाई द्वेषभावनेतून करण्यात आल्याचा आरोप वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे. याचा आम्ही निषेध करतो, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
राहुल गांधींची खासदारकी रद्द :काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष राहुल गांधी यांच्याविरोधात गुजरातमधील सुरत न्यायालयाने दोन वर्षांच्या शिक्षेचे आदेश दिले. त्यानंतर न्यायालयाने त्यांना जामीन ही मंजूर केला. यानंतर राहुल गांधी यांनी उच्च न्यायालयात दाद मागणार असल्याची घोषणा केली होती. दरम्यान, आजच संसदेकडून राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली.
द्वेषभावनेतून कारवाई :राहुल गांधी यांचे संसदेतील सदस्यपद रद्द केल्याच्या निर्णायावर वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. राहुल गांधी यांना न्यायालयाने शिक्षा सुनवल्यानंतर त्यांनी उच्च न्यायालयात जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. त्यांची वाट न पाहता राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करण्यात आली यामुळे याचा आम्ही तीव्र निषेध करतो आहे. तसेच द्वेषभावनेतून ही कारवाई करण्यात आली असल्याचा आरोप ही प्रकाश आंबेडकर यांनी केला आहे.
काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी :दरम्यान, राहुल गांधी यांच्यावर झालेल्या कारवाईविरोधात काँग्रेसमध्ये तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. स्थानिक पदाधिकाऱ्यांनी याविरोधात जेलभरो आंदोलन केले होते. देशभरात याविरोधात काँग्रेस कडून आंदोलन करण्यात येत आहे. त्यामुळे केंद्र सरकारने केलेली ही कारवाई द्वेषभावनेतून करण्यात आली असल्याचा आरोप करण्यात येत आहे. तसेच विरोधी पक्षातील नेत्यांनी केंद्र सरकारवर जोरदार टीका केली.
हेही वाचा : Eknath Shinde on Rahul Gandhi : राहुल गांधींविरोधातील आंदोलनावर मुख्यमंत्री शिंदेंचे मोठे वक्तव्य, म्हणाले, ' पंतप्रधानांचा अपमान हा...'