अकोला - मुंबई येथे वंचित बहुजन आघाडीचे नेते अॅड. प्रकाश आंबेडकर यांना रविवारी 'आरे'तील वृक्षतोडीला विरोध केल्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली. या अटकेच्या विरोधात अशोक वाटिका चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी तथा भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करीत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे प्रतिकात्मक पुतळा दहन केला. या कार्यकर्त्यांनी सरकारच्या विरोधात नारेबाजी करीत परिसर दणाणून टाकला होता. या ठिकाणी कोतवाली पोलीस दाखल झाले होते.
वंचित बहुजन आघाडी आणि भारिप बहुजन महासंघाच्या वतीने रास्तारोको करीत पुतळा दहन
'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्याकरता गेलेले बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. या अटकेच्या विरोधात अशोक वाटिका चौकामध्ये वंचित बहुजन आघाडी तथा भारिप-बहुजन महासंघाच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करीत पंतप्रधान व मुख्यमंत्री यांचे प्रतिकात्मक पुतळा दहन केला.
'आरे'तील वृक्षतोडीला विरोध करण्याकरता गेलेले बहुजन आघाडीचे अॅड. प्रकाश आंबेडकरांना पोलिसांनी ताब्यात घेतले. आंबेडकर यांच्या अटकेच्या विरोधात वंचित बहुजन आघाडी व भारिप बहुजन महासंघाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी वंचितच्या कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध करत घोषणाबाजी केली. तसेच पंतप्रधान व मुख्यमंत्री यांच्या प्रतिकात्मक पुतळा दहन केले. यासोबतच अशोक वाटिका रस्ता पूर्णपणे बंद केल्याने वाहतूक कोंडी झाली होती. यावेळी प्रदेश प्रवक्ते राजेंद्र पातोडे, जिल्हाध्यक्ष प्रमोद देंडवे, विकास सदांशीव, सीमांत तायडे, महेंद्र डोंगरे, प्रभा सिरसाट, यांच्यासह आदी उपस्थित होते. यावेळी सिटी कोतवाली पोलीस दाखल झाले होते.
हेही वाचा - आरे वृक्षतोडीला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाचा नकारच