अकोला - जिल्ह्यातील अकोला, अकोट व तेल्हारा तालुका परिसरातील काही भागांमध्ये बुधबारी मध्य रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली. तर पाथर्डी व देवरी परिसरात तुरळक प्रमाणात गारपीट झाल्याचे समजते. या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित करण्यात आला होता.
अकोला, अकोटसह तेल्हारा परिसरात अवकाळी पाऊस; पिकांचे नुकसान - अकोला
अकोला, अकोट व तेल्हारा तालुका परिसरातील काही भागांमध्ये बुधबारी मध्य रात्रीच्या सुमारास विजेच्या कडकडाटासह जोरदार पावसाने हजेरी लावली.
तेल्हारा तालुक्यातील पाथर्डी, घोडेगाव, कोठा यासह इतर काही गावांमध्ये मध्य रात्रीच्या सुमारास वादळी वाऱ्यासह विजेच्या कडकडाटासह पावसाच्या सरी बरसल्या. तर तालुक्यातील काही गावांमध्ये तुरळक प्रमाणात गारपीट झाल्याचे समजते. या अवकाळी पावसामुळे गहू, केळी, संत्रा, हरभरा या पिकांसह भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे शेतकरी वर्गात चिंतेचे वातावरण आहे.
अकोट तालुक्यातील देवरी माणगावसह इतर काही गावांमध्ये पावसाच्या सरी बरसल्या. तर देवरी फाटा परिसरात तुरळक प्रमाणात गारपीट झाली. या अवकाळी पावसामुळे अनेक ठिकाणचा वीजपुरवठा खंडित झाला होता. अनेक गावांमध्ये जोरदार वाऱ्यामुळे झाडे पडल्याच्या ही घटना घडल्या आहेत. मात्र, अद्यापर्यंत कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समजते.