अकोला - पातूर शहरातील धामणधरीच्या तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. हे दोघेही पोहण्यासाठी तिथे गेले होते. शेख दानिश शेख अस्लम आणि शेख समीर शेख रईस यांचा मृतकांमध्ये समावेश आहे.
अकोला : पातूर धरणात पोहायला गेलेल्या दोन युवकांचा बुडून मृत्यू - दोन युवकांचा मृत्यू
पातूर शहरातील धामणधरीच्या तलावात दोन युवकांचा बुडून मृत्यू झाल्याची घटना आज दुपारी घडली आहे. हे दोघेही पोहण्यासाठी तिथे गेले होते. शेख दानिश शेख अस्लम आणि शेख समीर शेख रईस यांचा मृतकांमध्ये समावेश आहे.
पातूर शहरातील साळणी पुरा येथील चार युवक हे पोहण्याकरिता धामणधरीच्या तलावामध्ये गेले होते. चार युवकांपैकी शेख दानिश शेख अस्लम (वय 16 वर्ष), शेख समीर शेख रईस (रा. साखरखेर्डा) हे दोघे पोहण्यासाठी पाण्यात उतरले होते. पाण्याचा अंदाज न आल्याने ते दोघे बाहेर येऊ शकले नाहीत. त्यामुळे त्यांच्या सोबत असलेले दोन मित्र घाबरले. एक मित्र तिथे थांबला तर दुसरा ही माहिती देण्यासाठी घरी गेला होता. या घटनेची माहिती शहरात वाऱ्यासारखी पसरली.
नागरिकांनी धामणधरी तलावाकडे धाव घेतली. मात्र, बराच वेळ होऊन सुद्धा दोघेही पाण्याबाहेर येत नसल्याने पातूर येथील देविदास श्रीनाथ यांनी तलावात उडी घेतली. त्यांनी दानिश व समीर या दोघांना बाहेर काढले. बाहेर काढल्यानंतर त्या दोघांचा मृत्यू झाल्याचे प्रत्यक्षदर्शी यांच्या लक्षात आले. घटनेची माहिती होताच नायब तहसीलदार अहेफाजोद्दीन सैय्यद, माजी नागराध्यक्ष हिदायत खा रूम खा, माजी नगरसेवक शे. अय्याज आणि पातूर पोलीस कर्मचारी घटनास्थळ दाखल झाले. दोघांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालय येथे पाठवण्यात आले.