अकोला- वीस पेक्षा जास्त काळविटांची शिकार करणाऱ्या दोन सराईत शिकाऱ्यांना मंगळवारी ( दि. 5 एप्रिल ) अकोट वनविभागाने अकोट येथील मौजा पाटी, मौजा जुऊळखेड शेत शिवारातून अटक केली आहे. वन्यप्राणी काळवीट शिकार करून वन्यप्राणीचे मास विकत असल्याची माहितीवरुन वनविभागाला ( Forest Department ) मिळाही होती. त्या माहितीच्या आधावारे ही कारवाई करण्या आली आहे. या कारवाईत एक जण पसार होण्यास यशस्वी झाला.
अकोट वन वर्तुळांतर्गत मौजा जऊळखेड, मौजा पाटी, येथील मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे वन्यप्राणी मादी काळवीटाची शिकार करून मांस विक्री करताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रंगेहात दोघांना पकडले. ज्ञानेश्वर गजानन जामेवार (रा. जऊळखेड ता. अकोट), सुज्योत राधकीसन मुंडाले (रा. पाटी ता. अकोट), अशी त्या दोघांची नावे आहेत. त्यांच्याकडून दोन मोटरसायकल ( क्र. एम एच-30-बी वाय- 5985, एम एच 30 बि के 7348 ), दोन मोबाईल व वन्यप्राणी काळवीट मादी यांचे 15 किलो मांस आदी साहित्य जप्त करण्यात आले.