अकोला-शहरातील नवबापुरा येथील घरात घरफोडी झाल्याची घटना उघड झाली आहे. या घरफोडीत १ लाख ९७ हजार रोकड आणि ७१ हजार किमतीचा सोन्याच्या ऐवजावर चोरट्यांनी हात साफ केला. या घटनेमुळे जुने शहर पोलिसांना आव्हान मिळाले आहे.
अडीच लाखाची घरफोडी; जुने शहर पोलिसांना आव्हान - Theft of two and half a million in Akola
अकोला शहरातील नवबापुर येथील एका घरात अडीच लाखांची घर फोडी झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी जुने शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अडीच लाखाची घरफोडी; जुने शहर पोलिसांना आव्हान
जुने शहर पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या नवबापुरा येथील याकूब खान युनूस खान यांच्या घरातील सदस्य दुसऱ्या परिसरात झोपण्यासाठी गेले होते. याचा फायदा घेत चोरट्यांनी घरात प्रवेश करत घरातील तिजोरी फोडून चोरट्यांनी २ लाख 68 हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. सकाळी कुटुंब घरी आले असता चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी जुने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट देत पंचनामा तयार केला.