अकोला - बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शंभर फूट खोल काटेपूर्णा नदी पात्रात ट्रक कोसळला. या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून एक गंभीर जखमी आहे. साहेब खा युसुफ खा असे मृत चालकाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
काटेपूर्णा नदीपात्रात ट्रक कोसळला दाट धुके आणि खड्डा चुकवण्याच्या नादात अपघात-
मुर्तीजापूरकडून अकोलाकडे जाणारा एमएच - 48 - एजी - 1465 हा मालवाहू ट्रक कोळसा वाहून नेत होता. काटेपूर्णा नदीच्या पुलावरून जात होता. समोर दाट धुके आणि मार्गावरील खड्डे चुकविण्याचा प्रयत्न करत असताना चालकाचा गाडीवरील ताबा सुटला आणि ट्रक थेट १०० फूट खोल ट्रक काटेपुर्णा नदीच्या पात्रात पडला. हा अपघात इतका भयंकर होता की अपघातानंतर ट्रकचा चुराडा झाला.
काटेपूर्णा नदीपात्रात ट्रक कोसळला ट्रकचालक जागीच ठार तर क्लिनर गंभीर जखमी
या अपघातात ट्रकचालकाचा जागीच मृत्यू झाला तर तर क्लीनर औरंगजेब खा हलील खा हा गंभीर जखमी झाला आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच ठाणेदार सुनील सोळंके, हेड कॉन्स्टेबल दिपक कानडे, योगेश काटकर, धनसिंग राठोड यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी क्लिनरला काटेपुर्णा येथील आपतकालीन पथकाच्या मदतीने अकोला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारासाठी दाखल केले आहे.