अकोला -शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त अकोला शिवसेना शहर प्रमुख अतुल पवनीकर यांनी सायकल रॅली घेऊन बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली. पक्ष कार्यालयापासून सुरू झालेल्या या रॅलीचा समारोप गायगाव येथे करण्यात आला.
माहिती देताना शिवसेना आमदार नितीन देशमुख हेही वाचा -हेल्थ केअर सेंटरच्या नावाखाली अकोल्यात देहव्यापार, तिघे ताब्यात
बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेनेतर्फे जिल्ह्यात विविध कार्यक्रम घेण्यात येत आहे. कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. मात्र, अकोला शहर प्रमुख अतुल पवनीकर यांनी बाळासाहेब ठाकरे यांना आदरांजली अर्पण करण्यासाठी एक नवा उपक्रम घेतला. पर्यावरणपूरक, प्रदूषण मुक्त आणि इंधन बचतीच्या उद्देशाने पक्ष कार्यालयापासून सायकल रॅली काढून त्यांनी बाळासाहेबांना आदरांजली अर्पण केली.
सायकल रॅलीला आमदार गोपीकिशन बजोरिया, आमदार नितीन देशमुख यांनी हिरवी झेंडी दाखवली. यावेळी पक्षाचे पदाधिकारी व महिला पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या रॅलीचा समारोप गायगाव येथे करण्यात आला. रॅलीत विजयी स्पर्धकांना पारितोषिकेही देण्यात आली.
हेही वाचा -किसान सभा काढणार २० हजार शेतकऱ्यांचा वाहन मोर्चा