महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोटमधील मोहाळ्यात भाजप कार्यकर्त्याचा खून - akola crime

या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून मुख्यालयातील पोलीस तुकडी तैनात करण्यात आली आहे.

प्रतिकात्मक छायाचित्र

By

Published : May 25, 2019, 12:52 AM IST

अकोला- तालुक्यातील मोहाळा येथे दोघांवर प्राणघातक हल्ला झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी घडली. यामध्ये एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मतीन पटेल असे मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीचे नाव असून तो भाजप कार्यकर्ता आहे.

अकोट ग्रामीण रुग्णालयाबाहेरील बंदोबस्त

या घटनेमुळे गावात तणावपूर्ण शांतता असून मुख्यालयातील पोलीस तुकडी तैनात करण्यात आली आहे. मोहाळा येथील मतीन पटेल यांच्यासह एकावर अज्ञातांनी हल्ला केला. यामध्ये मतीन पटेल यांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर त्यांच्यासोबत असणारा एक जण गंभीर जखमी झाला. या घटनेची माहिती गावात मिळताच तणाव निर्माण झाला.

अकोट ग्रामीण पोलिसांनी वेळीच घटनास्थळावर धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या गावात तणावपूर्ण शांतता असून घटनास्थळी पोलीस तुकडी तैनात करण्यात आली आहे. या घटनेला राजकीय किनार असल्याचे बोलले जात आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details