महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात सूर्य कोपला; उष्माघाताने तीन महिला रुग्णालयात - heat

गेल्या तीन दिवसांमध्ये अकोल्याच्या तापमान अकोल्याचे तापमान ४६.४ अंशांनी वाढले आहे. कडक ऊन आणि गरम हवेमुळे नागरिक थंड ठिकाणचा शोध घेत आहेत. डॉ. मुकुंद अष्टपुत्रे

उष्माघाताचे रुग्ण

By

Published : Apr 27, 2019, 11:40 AM IST

अकोला- गेल्या तीन दिवसांपासून अकोल्यात वाढलेल्या तापमानामुळे अनेकांना उष्माघाताचा फटका बसला आहे. तीन महिलांवर सर्वोपचार रुग्णालयातील उष्माघात कक्षात उपचार सुरू असून पुरुष कक्षामध्येही एकावर उपचार सुरू आहेत. दरम्यान, वाढत्या उन्हात नागरिकांनी फिरू नये, असे आवाहन वैद्यकीय अधिकाऱ्यांनी केले आहे.

डॉ. मुकुंद अष्टपुत्रे

'हिट वेव्ह' हे ३० एप्रिल पर्यंत राहणार असल्याचे नागपूर हवामान खात्याने सांगितले आहे. त्यामुळे अकोल्याचे तापमान ४६.४ अंशांनी वाढले आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये अकोल्याच्या तापमानाने उच्चांक गाठला असून कडक ऊन आणि गरम हवेमुळे नागरिक थंड ठिकाणचा शोध घेत आहेत. या वातावरणामुळे त्रास होत असल्याने सर्वत्र घरांमध्ये कुलर आणि एसी सुरू राहत असल्याचे चित्र आहे. या कडक ऊन्हामुळे रस्त्यांवरही शुकशुकाट पहायला मिळत आहे. तर कुठलीही काळजी न घेतल्यामुळे अनेकांना ऊन लागण्याचा त्रास होत आहे.

ग्रामीण भाग आणि शहरी भागातील उष्माघाताच्या रुग्णांना सर्वोपचार रुग्णालयात उपचार मिळावा यासाठी वेगळा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. पुरुषांसाठी वार्ड क्र. ६ मध्ये तर महिलांसाठी वार्ड क्र. ५ मध्ये उष्माघात कक्ष निर्माण करण्यात करण्यात आले आहेत. उष्माघाताचा त्रास तीन महिलांना झाला असून त्यांच्यावर सर्वोपचार रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर या त्रासामुळे एक व्यक्तीही रुग्णालयात उपचार घेत आहे. वाढत्या उन्हामुळे अनेकांना उष्माघाताचा फटका बसण्याची शक्यता नाकारता येत नाही.

अशी घ्यावी काळजी

उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांनी योग्य ते उपाय योजना कराव्यात, जास्तीत जास्त म्हणजेच पाच ते सहा लिटर पाणी दररोज प्यावे, दुपट्टा किंवा रुमाल कानाला बांधूनच घरा बाहेर निघावे. एसी किंवा कुलरच्या थंड हवेतून बाहेर पडताना थोडावेळ थांबून उन्हात कानाला बांधून बाहेर पडावे, असे आवाहन सर्वोपचार रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी डॉ. मुकुंद अष्टपुत्रे यांनी केले आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details