महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

अकोल्यात कोरोनाचे १३ रुग्ण वाढले; रुग्णांची संख्या १८४१ वर - अकोल्यात 13 कोरोना रुग्ण वाढले

अकोल्यात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण वाढल्याने कोरोनाबाधित रुग्ण संख्या १८४१ वर पोहोचली आहे. यापैकी १३६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

Akola corona update
अकोला कोरोना अपडेट

By

Published : Jul 10, 2020, 12:34 PM IST

अकोला - अकोल्यामध्ये आज सकाळी प्राप्त झालेल्या तपासणी अहवालामध्ये १३ अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये बाळापूर, बार्शीटाकळी या तालुक्‍यातील रुग्णांचा समावेश आहे. ग्रामीण भागातील रुग्णसंख्या वाढत असून ही चिंताजनक बाब आहे.

सकाळी प्राप्त झालेले १३ अहवाल सहा महिला व सात पुरुषांचे आहेत. त्यातील तिघे अकोट, तिघे बाळापूर, दोन बार्शीटाकळी, दोन कृषीनगर तर उर्वरीत तारफैल, कावसा तालुका अकोट व पातूर येथील प्रत्येकी एक या प्रमाणे रहिवासी आहेत.

जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १८४१ वर पोहोचली आहे. यापैकी १३६९ जण कोरोनामुक्त झाले आहेत. जिल्ह्यात ९१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.३८१ रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

सकाळचा प्राप्त अहवालानुसार

प्राप्त अहवाल-२१०

पॉझिटिव्ह- १३

निगेटिव्ह- १९७

आता सद्यस्थिती

एकूण पॉझिटिव्ह अहवाल- १८२०+२१= १८४१

मृत्यू-९१ (९०+१)

डिस्चार्ज- १३६९

दाखल रुग्ण (ॲक्टिव्ह पॉझिटिव्ह)- ३८१

ABOUT THE AUTHOR

...view details