महाराष्ट्र

maharashtra

अकोलेकरांचे 'बुलेट ट्रेन'चे स्‍वप्‍न होणार पूर्ण; सर्वेक्षणासाठी पथक झाले दाखल

By

Published : Mar 15, 2021, 9:46 PM IST

Updated : Mar 15, 2021, 10:06 PM IST

मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनसाठी लिडार सर्वेक्षण करण्यासाठी अकोल्यामध्ये आज (दि. 15 मार्च) सायंकाळी पथक दाखल झाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) तर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अकोला सीमेलगत असलेल्या कारंजा लाड या गावावरून या पथकाचे विमान उद्या (दि. 16 मार्च) पहाटे उडणार आहे.

विमान
विमान

अकोला- मुंबई ते नागपूर बुलेट ट्रेनसाठी लिडार सर्वेक्षण करण्यासाठी अकोल्यामध्ये आज (दि. 15 मार्च) सायंकाळी पथक दाखल झाले आहे. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (एनएचएसआरसीएल) तर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. अकोला सीमेलगत असलेल्या कारंजा लाड या गावावरून या पथकाचे विमान उद्या (दि. 16 मार्च) पहाटे उडणार आहे. हे पथक जालना ते नागपूर अशी हवाई पाहणी करणार आहे. त्यामुळे अकोलेकरांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न भविष्यात पूर्ण होणार, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

अकोलेकरांचे 'बुलेट ट्रेन'चे स्‍वप्‍न होणार पूर्ण

बुलेट ट्रेन उभारण्यासाठी विमानाद्वारे आलेल्या पथकाने नाशिक ते अकोला दरम्यान सर्वेक्षण केले. सायंकाळी हे पथक अकोल्यात दाखल झाले आहे. उद्या हे पथक अकोला ते जालना व जालना ते अकोलामार्गे नागपूर, असे उड्डाण घेणार आहे. अकोला ते नागपूर दरम्यान चित्रीकरण करण्यात येणार असून अंदाजे 736 किलोमीटर अंतराच्या या प्रस्तावित बुलेट ट्रेन प्रकल्पामुळे नागपूर, वर्धा, पुलगाव, कारंजा, मालेगाव, मेहकर, जालना, औरंगाबाद, शिर्डी, नाशिक, इगतपुरी आणि शहापूर ही शहरे जोडली जाणार आहेत. नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक पंकज ऊके या सर्वेक्षणात सहभागी आहेत.

या प्रकल्पाला सरकारने हिरवी झेंडी दाखविल्यास अकोलेकरांचे बुलेट ट्रेनचे स्वप्न पूर्ण होणार आहे. बुलेट ट्रेनमुळे अकोलेकरांना नागपूर आणि मुंबई हा प्रवास अति जलद गतीने गाठता येणार आहे. त्यामुळे लोहमार्ग, राष्ट्रीय महामार्ग, विमानसेवा आणि आता बुलेट ट्रेनच्या सेवेमुळे अकोला शहराचे महत्त्व अधिक वाढणार आहे.

समृद्धी महामार्ग लगत असलेल्या जमिनीचा या प्रकल्पासाठी शोध घेण्यात येत आहे. शासनाच्या जमिनीवर हा प्रकल्प असावा या उद्देशाने समृद्धी महामार्ग लगत पाहणी करण्यात येत आहे. खासगी जमिनी खरेदी करण्यासाठी येणाऱ्या अडचणींना तोंड न देता समृद्धी महामार्गाला आवश्यक असलेल्या जमिनी मधूनच हा प्रकल्प उभा करता येईल का या दृष्टिकोनातून प्रयत्न सुरू असल्याची माहिती नॅशनल हाय स्पीड रेल कॉर्पोरेशनचे महाव्यवस्थापक पंकज ऊके यांनी दिली आहे.

हेही वाचा -पेन्शन धारक संघर्ष समितीचे विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने

हेही वाचा -पैशाच्या कारणावरून एकाचा खून, आरोपी दोन तासांतच अटकेत

Last Updated : Mar 15, 2021, 10:06 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details