अकोला- विदर्भातील तापमानाने चांगलाच जोर धरला आहे. त्यातही अकोल्यातील पारा आज 45.1 पोहोचला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानातील ही वाढ मे महिन्यातील उष्णतेची चिंता वाढवून गेला. विदर्भातील आजच्या तापमानातील अकोला हे सर्वात जास्त 'हॉट' राहीले.
विदर्भात अकोला सर्वात जास्त 'हॉट'; पारा वाढल्याने नागरिकांचे हाल - तापमान
अकोल्यातील पारा आज 45.1 पोहोचला. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात तापमानातील ही वाढ मे महिन्यातील उष्णतेची चिंता वाढवून गेला.
गेल्या आठ दिवसांपासून तापमानामध्ये होत असलेला चढ-उतार आणि मधातच दोन दिवस बदलीने अकोल्यातील उष्णतेची लाट कमी झाली होती. तर गेल्या तीन दिवसांपासून अकोल्याचे तापमान 41 ते 43 अंशाच्या जवळपास राहिले. हळूहळू सूर्य आग ओकत असतानाच त्याने आपला जलवा अकोलेकरांना दाखविला. अकोल्याचे आजचे तापमान 45.1 अंश होते. एप्रिल महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील या तापमानाने विदर्भाचा उष्णतेच्या जिल्ह्यांमध्ये मे महिने आधीच पहिला क्रमांक लावला. या कडक उन्हामुळे आज शहरात शुकशुकाट होता. मुख्य रस्त्यांवर वाहनधारक फारच तुरळक दिसत होते. प्रवाशांना ऑटोमधून ने-आण करणारे ऑटोचालकही आज रस्त्यावर विरळ प्रमाणात धावताना दिसले. त्यामुळे प्रवाशांना ऑटोची वाट पाहत भर उन्हात ताटकळत उभे राहावे लागले. अंगाला चटके लागणारे हे उन अकोलेकरांसाठी आज थक्क करून गेले. या कडक उन्हात मात्र वाहतूक सुरळीत करण्यासाठी वाहतूक पोलीस तैनात होते, हे विशेष.
विदर्भामध्ये अमरावतीचे तापमान 44 अंशावर होते. तर ब्रह्मपुरी 44.7, चंद्रपूर 44.2 अंश तापमान राहिले. अकोल्याचा पारा विदर्भातील इतर जिल्ह्यांपेक्षा आज जास्त राहिला. मे महिन्यात यापेक्षा जास्त तापमान राहण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.