अकोला - राज्यात लोकसभा निवडणुकीचा जोर चढत चालला असतानाच उन्हाचा पाराही वाढत आहे. अकोल्याचा पार आज ४१.४ अंशावर पारा गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहिले आहे. मार्च महिना संपत नाही, तोच उन्हाचा कडाका अकोलेकरांना जाणवत असून रस्ते निर्मणुष्य होत आहेत. वाहन चालकांच्या डोक्यावर टोपी आणि पांढरे दुपट्टे तसेच डोळ्यावर काळा चष्मा दिसून येत आहे.
अकोल्याचा पारा ४१ अंशावर. . वाढत्या तापमानाने नागरिक हैराण - तापमान
अकोल्याचा पार आज ४१.४ अंशावर पारा गेला आहे. गेल्या आठवड्याभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहिले आहे.
यावर्षी मार्च महिन्याच्या सुरुवातीलाच अकोल्याचे तापमान ३६ अंशावर आले होते. त्यानंतर तापमानात चढ-उतार जाणवत होता. गेल्या आठवडाभरापासून अकोल्याचे तापमान ३७ ते ४० अंशावर राहत होते. परंतु, आजच्या तापमानाने मार्च महिन्यातील उच्चांकी गाठल्याचे समजते. आजचे ऊन कडक आणि शरीराला चटके देणारे होते. या कडक उन्हात पाण्यासाठीही नागरिकांची फरपट सुरू होती.
अशा रखरखत्या उन्हात जनजीवन विस्कळीत झालेले नव्हते. परंतु, मुख्य रस्त्यावर वाहतूक नेहमीपेक्षा कमी दिसून आली. तसेच पादचारीही ऑटोचा उपयोग करताना दिसून आले. दरम्यान, एप्रिल व मे महिना लागण्याआधीच अकोल्याचा पारा ४१ अंशांवर गेल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. हा पारा एप्रिल महिन्यात ४७ किंवा ४८ अंशावर जाण्याची शक्यता नागरिकांमधून वर्तविण्यात येत आहे. नागरिकांची रसवंती, शरबत या दुकानांवर मोठी गर्दी होत आहे.