महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

ओबीसींचे शैक्षणिक आरक्षणही सुपात - रेखा ठाकूर - वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर

'राज्यकर्त्यांनी नेहमीच ओबीसी प्रवर्गातील मतदारांचा वापर मतदानापुरता केला आहे. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. शिवाय शैक्षणिक आरक्षणही सुपात आहे', असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी म्हटले आहे.

akola
Akola

By

Published : Jul 17, 2021, 4:45 PM IST

अकोला - 'राज्यकर्त्यांनी नेहमीच ओबीसी प्रवर्गातील मतदारांचा वापर मतदानापुरता केला आहे. त्यामुळेच ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आले आहे. शिवाय शैक्षणिक आरक्षणही सुपात आहे', असे वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर यांनी शनिवारी (17 जुलै) म्हटले आहे.

वंचित बहुजन आघाडीच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षा रेखा ठाकूर

प्रकाश आंबेडकरांची सर्जरी, रेखा ठाकूर वंचितच्या प्रभारी

वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲड. प्रकाश आंबेडकर यांच्यावर मुंबई येथील खासगी रुग्णालयात बायपास सर्जरी करण्यात आली. त्यापूर्वी आंबेडकर यांनी वंचितच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी रेखाताई ठाकूर यांच्याकडे सोपवली होती. त्यामुळे वंचितच्या प्रभारी प्रदेशाध्यक्ष रेखा यांनी त्यांच्या विदर्भ दौऱ्याला शनिवारपासून अकोला येथून सुरुवात केली. यानिमित्ताने अकोल्यात आयोजित पत्रकार परिषदेत रेखा ठाकूर बोलत होत्या.

ओबीसीचे शैक्षणिक आरक्षणही धोक्यात?

ओबीसी प्रवर्गाचे राजकीय आरक्षण आता सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांसह यापूर्वी सत्तेत असलेल्या राजकीय पक्षांमुळेच धोक्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. शिवाय, 'वेळीच ओबीसी प्रवर्गातील मतदार जागृत न झाल्यास त्यांचे शैक्षणिक आरक्षणही संपुष्ठात येऊ शकते', असेही त्या यावेळी म्हणाल्या.

'राजकीय हस्तक्षेपामुळेच जि.प.च्या निवडणुका स्थगित'

'कोरोना काळातही पश्चिम बंगालमध्ये विधानसभेच्या निवडणुका होऊ शकतात, तर राज्यात जिल्हा परिषदेच्या पोटनिवडणुकांचा कार्यक्रम जाहिर झाल्यानंतरही त्या स्थगित करण्यात येतात. केवळ राजकीय हस्तक्षेपामुळेच या निवडणुका स्थगित करण्यात आल्या आहेत', असा आरोप रेखा ठाकूर यांनी केला.

'आगामी निवडणुकीत लहान पक्षांना सोबत घेणार'

'राज्यातील आगामी महापालिकेच्या निवडणुका वंचित बहुजन आघाडी स्वबळावर लढणार आहे. तसेच, समविचारी लहान पक्षांना सोबत घेवून निवडणूक लढण्याची इच्छा आहे. त्यासंदर्भात चाचपणी सुरू आहे', असेही त्यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

हेही वाचा -व्हॉट्सअपचा दणका! एकाच महिन्यात बंद केली 20 लाख भारतीयांची अकाउंट

ABOUT THE AUTHOR

...view details