महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

स्थायी, समाज कल्याण समितीवरून अडले घोडे; सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेच्या फैरी - akola news

स्थायी समितीसह समाज कल्याण समितीच्या सदस्य पदांसाठी प्रत्येकी १० ते १४ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. समितीमध्ये सदस्यांची संख्या केवळ ८ असल्याने या सदस्य निवडीवरून चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या २ तर एका अपक्ष सदस्याला स्थायी समितीमध्ये स्थान मिळावे, यासाठी सभा सुरू झाल्यानंतरही सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसून आली.

akola
स्थायी, समाज कल्याण समितीच्या सदस्यपादवरून सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेच्या फैरी

By

Published : Feb 11, 2020, 7:29 PM IST

Updated : Feb 11, 2020, 9:02 PM IST

अकोला - जिल्हा परिषदेतील १० विषय समित्यांच्या रचनेसाठी मंगळवारी सर्वसाधारण सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी सदस्यांच्या निवडीसंदर्भात एकमत न झाल्याने दुपारी सव्वाचारपर्यंत ही सभा सुरू होऊ शकली नाही. सदस्यांची निवड बिनविरोध होण्यासाठी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चर्चेच्या फैरी सुरू होत्या.

स्थायी, समाज कल्याण समितीच्या सदस्यपादवरून सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चेच्या फैरी

अध्यक्ष प्रतिभा भोजने, उपाध्यक्ष सावित्री राठोड आणि सभापती चंद्रशेखर पांडे यावेळी सभागृहातून निघून गेले. त्यामुळे सदस्यांच्या निवडीवरून उशिरापर्यंत सताधाऱ्यांमध्येच एकमत होऊ न शकल्याने सभागृहात विरोधकांव्यतिरिक्त सत्ताधारी सदस्यही सभागृहाबाहेर होते.

हेही वाचा - फेसबुकच्या माध्यमातून मैत्री करून अल्पवयीन मुलीला ओढले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर...

मंगळवारी दुपारी एक वाजता जिल्हा परिषदेच्या छत्रपती राजश्री शाहू महाराज सभागृहात ही सभा भरली होती. सदस्यांच्या निवडीसाठी सकाळी ९ ते ११ वाजेपर्यंत नाम निर्देशनपत्र सादर करण्यात आले होते. त्याअंतर्गत जल व्यवस्थापन, पाणी व स्वच्छता समितीसाठी ६, महिला व बाल कल्याण समितीसाठी ८ आणि अर्थ समितीच्या सदस्य पदासाठीही ८ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. या विषय समित्यांची निवडणूक बिनविरोध झाली. मात्र, बांधकाम, पशुसंवर्धन, शिक्षण व क्रीडा तसेच आरोग्य समितीच्या प्रत्येकी ८ सदस्यपदांसाठी ९ ते १० सदस्यांनी नामनिर्देशन पत्र दाखल केल्याने याबाबत एकमत होऊ शकले नाही.

हेही वाचा - भाजपला सत्तेचा वनवास संपवता आला नाही , 'आप'च्या विजयासाठी 'हे' मुद्दे ठरले महत्त्वाचे

स्थायी आणि समाज कल्याण संदर्भात एकमत नाही

स्थायी समितीसह समाज कल्याण समितीच्या सदस्य पदांसाठी प्रत्येकी १० ते १४ सदस्यांनी अर्ज दाखल केले होते. समितीमध्ये सदस्यांची संख्या केवळ ८ असल्याने या सदस्य निवडीवरून चुरस निर्माण झाली आहे. शिवसेनेच्या २ तर एका अपक्ष सदस्याला स्थायी समितीमध्ये स्थान मिळावे, यासाठी सभा सुरू झाल्यानंतर सुद्धा सत्ताधाऱ्यांमध्ये चर्चा होताना दिसून आली. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत त्यासंदर्भात एकमत न झाल्याने सर्वसाधारण सभेचे कामकाज सुरू होऊ शकले नाही.

Last Updated : Feb 11, 2020, 9:02 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details