महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अकोल्यामध्ये सहाने वाढ - प्रत्यक्षात आता 63 जणांवर उपचार सुरू

अकोल्यामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. जिल्ह्यात एकूण 88 कोरोनाबाधित रुग्ण असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली असून प्रत्यक्षात आता 63 जणांवर उपचार सुरू आहेत.

रुग्णांच्या संख्येत अकोल्यामध्ये सहाने वाढ

By

Published : May 7, 2020, 12:11 PM IST

अकोला - अकोल्यामध्ये कोरोना पॉझिटिव रुग्णांची संख्या कमी होताना दिसून येत नाही. आज सकाळी प्राप्त अहवालानुसार परत सहा रुग्ण पॉझिटिव्ह सापडले आहेत. जिल्ह्यात एकूण 88 कोरोनाबाधित रुग्ण असून 11 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 14 जणांनी कोरोनावर मात केली असून प्रत्यक्षात आता 63 जणांवर उपचार सुरू आहेत.

कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या संख्येत अकोल्यामध्ये सहाने वाढ

शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात तपासण्यात आलेल्या सहा अहवालांमधून सर्व अहवाल हे कोरोना पॉझिटिव्ह आले आहेत. हे रुग्ण राधाकिसन प्लॉट, उगवा, अकोट फ़ैल, बैदपुरा, माळीपूरा, खंगारपुरा येथील रहिवासी आहेत. तर एक महिला स्त्री रुग्णालयातून संदर्भित करण्यात आली आहे. ती ही अकोट फ़ैल येथील रहिवासी आहे.

जिल्हास्तरीय रुग्णालयातून संदर्भित करण्यात आलेल्या कोरोना पॉझिटिव्ह महिला रुग्णाच्यामुळे बाहेर जिल्ह्यातून आलेल्या महिलांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे. या रुग्णालयात मोठ्या प्रमाणात प्रसूतीसाठी गर्भवती महिला उपचार घेत असतात हे विशेष.

For All Latest Updates

ABOUT THE AUTHOR

...view details