महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

झालंय उलटं.. अकोल्यात ऑक्सिजनच्या रिकाम्या सिलेंडरचा तुटवडा; ऑक्सिजन भरायचे कशात हाच प्रश्न - अकोला कोरोना अपडेट

ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. परंतु, ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी याबाबत आता नवीन समस्या उभी राहिली आहे. ऑक्सिजन तयार होत आहे. मात्र, ऑक्सिजन भरण्यासाठी रिकामे सिलेंडर मिळत नसल्याने रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्यात अडचणी येत आहेत.

अकोला
अकोला

By

Published : Apr 16, 2021, 9:03 PM IST

अकोला- कोरोना रुग्णांची संख्या वाढत असताना ऑक्सिजनची मागणीही वाढली आहे. परंतु, ही मागणी पूर्ण करण्यासाठी प्रयत्न होत असले तरी याबाबत आता नवीन समस्या उभी राहिली आहे. ऑक्सिजन तयार होत आहे. मात्र, ऑक्सिजन भरण्यासाठी रिकामे सिलेंडर मिळत नसल्याने रुग्णांपर्यंत ऑक्सिजन पोहोचविण्यात अडचणी येत आहेत. त्यामुळे सध्या ऑक्सिजनच्या रिकाम्या सिलेंडरचा तुटवडा भासत असल्याने ऑक्सिजन कशात भराचे, असा यक्ष प्रश्न निर्माण झाला आहे.

अकोला

अकोल्यात सरकारी रुग्णालयामध्ये ऑक्सीजन टॅंक उभारले आहेत. त्यामुळे जेवढी ऑक्सिजनची आवश्यकता आहे, तेवढीच उपलब्ध करता येत आहे. पण भविष्यात रुग्ण वाढले तर स्थिती गंभीर होऊ शकते. तर दुसरीकडे ऑक्सीजन भरण्यासाठी लागणारे सिलेंडर वाढत्या कोरोना रुग्णांमुळे लवकर खाली होत नसल्याने ऑक्सिजन भरण्यास अडचणी जात आहे, ही नवीन समस्या समोर आली आहे. कोरोना केंद्रांमध्ये वाढलेल्या साठ्यामुळे आता ऑक्सिजन उपलब्ध असूनही ऑक्सिजनची रिकामे सिलेंडर नसल्याने ऑक्सिजन पुरवठा करता येत नसल्याची परिस्थिती आहे.

चार ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या फर्मस

अकोल्यात सध्याच्या परिस्थितीत सरकारी आणि खासगी रुग्णालयात ऑक्सिजन जेमतेम आहे. पण आणखी एका नवीन संकटाला सामोरे जावे लागत आहे. ऑक्सिजन प्लांटमध्ये ऑक्सिजन आहे. पण त्याला भरून रुग्णालयापर्यंत पुरविण्यासाठी सिलेंडर आता कमी पडू लागलेले आहेत. अकोल्यामध्ये चार ऑक्सिजन पुरवठा करणाऱ्या फर्मस आहेत. त्यांच्याकडे जवळपास तीन हजार ते 3200 सिलेंडर्स आहेत. पण, सध्या कोविड रुग्णाच्या वाढत्या संख्यामुळे प्रशासनाने आणखी काही कोविड सेंटरला मान्यता दिली. त्यामुळे ऑक्सीजन सिलेंडरचा पुरवठा वाढला. ऑक्सीजनसाठी लागणाऱ्या साठा पाहिजे तितका येत आहे. ऑक्सीजनही उपलब्ध आहे. पण या अक्सिजनला साठवून रुग्णालयातपर्यंत नेणारे रिकामे सिलेंडर नसल्याने नवीन संकट या ऑक्सिजन पुरवठा प्रशासनासमोर आला आहे. नवीन खाली सिलेंडर मागायचे म्हटले तर आणखी एक ते दीड महिना वाट पहावी लागणार आहे.

अकोल्याच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जिल्हा स्त्री रुग्णालय आणि मूर्तीजापूरच्या उपजिल्हा रुग्णालयात प्रशासनाने तीन ऑक्सिजनचे प्लांट उभारले आहेत. त्यामुळे सध्या तंतोतंत ऑक्सिजन पुरवठा होत आहे. तर फेब्रुवारी-मार्चमध्ये चार ते पाच मेट्रिक टन एवढे ऑक्सीजन लागत होते. पण आता रुग्ण वाढल्याने हाच ऑक्सिजन साठा 11.156 मेट्रिक टन वर पोहोचला असला तरी तो उपलब्ध आहे. पण, मागणी वाढल्याने आता रोजचा 10.940 मेट्रिक टन इतके ऑक्सिजन लागत आहे. म्हणजे हा अक्सिजन साठा आता पुरवठा असलेल्या ऑक्सीजनपर्यंत पोहोचला आहे.

ABOUT THE AUTHOR

...view details