अकोला -तारांकित हॉटेलमध्ये शिवसेनेच्या आमदारांकडून स्वाक्षरी घेण्यात आली. परंतु ही स्वाक्षरी केली, नसल्याचे स्पष्टीकरण आमदार नितीन देशमुख यांनी आज पत्रकार परिषदेत दिले. शासकीय विश्रामगृह येथे आयोजित ते बोलत होते. माझी स्वाक्षरी दुसरे कोणी मारली असेल, अशी त्यांनी यावेळी शंका व्यक्त केली आहे. मी इंग्रजीमध्ये सही करतो मराठीत नाही. त्यामुळे ही सही माझी नाही. ही स्वाक्षरी मराठीत असल्याचा दावाही, आमदार नितीन देशमुख यांनी केला आहे. ( Shiv Sena MLA Nitin Deshmukh )
भाजपावर आरोप - शिवसेनेच्या आमदारांच्या स्वाक्षरीवरून उपस्थित झालेल्या प्रश्नावरून मोठा वाद निर्माण झालेला आहे. आमदार नितीन देशमुख ते गुवाहाटी येथून अकोल्यात परत आले आहे. ते परत आल्यानंतर त्यांनी आज सायंकाळी शासकीय विश्रामगृह येथे पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांनी त्यांच्यासोबत घडलेल्या प्रकाराबाबत सांगितले. या सर्व प्रकारामुळे मी विचलित झालो आहे. भारतीय जनता पक्षातर्फे गुजरातमध्ये आमच्या आमदारांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न करण्यात आला, असल्याचा आरोप त्यांनी केला. त्यासोबतच गुजरातमध्ये मराठी माणसांवर मोठ्या प्रमाणात अन्याय होत असल्याचेही त्यांनी त्यांच्या सोबत घडलेल्या प्रकारावरून सांगितले.
व्हिडिओ जुना असल्याचा दावा - पत्रकारांच्या स्वाक्षरी संदर्भात त्यांनी हे स्वाक्षरी माझी नसल्याचे स्पष्टीकरण दिले. माझा स्वाक्षरी करण्याचा व्हिडिओ जुना लावला असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासोबतच मी इंग्रजीमध्ये स्वाक्षरी करत असतो. माध्यमांमध्ये स्वाक्षरी दाखविण्यात आली आहे ती मराठीत आहे. त्यामुळे ही स्वाक्षरी माझी नाही, असे स्पष्टीकरण त्यांनी यावेळी केले आहे. या पत्रकार परिषदेला जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, शहर प्रमुख राजेश मिश्रा यांच्यासह आदी पदाधिकारी उपस्थित होते.